भाविकांसाठी जम्मू काश्मीर येथील तिरुपती बालाजी मंदिराचे द्वार 8 जून रोजी उघडणार

जम्मू- काश्मीर – जम्मू मधील तिरुपती बालाजी मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या 8 जून रोजी मंदिराचे द्वार भाविकांसाठी उघडले जाणार आहेत. तिरुपती तिरूमला देवस्थानमने कटरा आणि जम्मू दरम्यान तिरुपती बालाजी मंदिराचे बांधकाम केले आहे.

टी.टी.डी. चे प्रमुख वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी दिलेल्या माहिती नुसार जम्मू येथील हे बालाजी मंदिर आंध्र प्रदेश राज्याच्या बाहेर बांधले जाणारे सहाव्या (6) क्रमांकाचे बालाजी मंदिर असेल. यापूर्वी टी.टी.डी.ने दिल्ली, भुवनेश्वर, हैदराबाद, चेन्नई, आणि कन्याकुमारी येथे मंदिराचे बांधकाम केलेले आहे. जम्मू येथील तिरुपती बालाजी मंदिरात तिरुपती येथे भाविकांसाठी जी व्यवस्था आहे त्याच धर्तीची व्यवस्था आणि प्रथा-परंपरा या सुद्धा त्याच असतील.

Photo- state times