मंत्रोच्चारात वीरशैव समाजाचा सामुहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न.

शिवाचार्यांची विशेष उपस्थिती; आशिर्वादासह संसारोपयोगी साहित्य प्रदान.

परळी वैजनाथ, एम.एन एस न्यूज नेटवर्क- परळी वीरशैव समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वीरशैव समाज सामुहिक विवाह सोहळा आज बुधवार दि.7 जुन रोजी हालगे गार्डन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळयात वधु वरांना आशिर्वाद देण्यासाठी शिवाचार्यांसह समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती. सनई चौघड्यांच्या निनादात अक्षदा कार्यक्रम पार पडला.

प.पू.ष.ब्र.श्री 108 तपोरत्न प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांच्या प्रेरणेने वीरशैव समाज परळीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आयोजित वीरशैव समाज सामूहिक विवाह सोहळा बुधवार दिनांक 7 जून रोजी थाटात संपन्न झाला.या सोहळ्यात वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी चार शिवाचार्यांची प्रमुख उपस्थिती होती. ष.ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पुर्णाकर, ष.ब्र.108 शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर, ष.ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर, ष.ब्र.108 चंद्रशेखर गुरु प्रभू पंडिताराध्य महाराज माजलगावकर या शिवाचार्यांची पाद्यपूजा समाजातील मान्यवरांच्या हस्ते करून विवाह सोहळ्याला सुरूवात झाली. ष.ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पुर्णाकर, ष.ब्र.108 शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर, ष.ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर, ष.ब्र.108 चंद्रशेखर गुरु प्रभू पंडिताराध्य महाराज माजलगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सनई चौघड्याच्या निनादात, मंत्रोच्चारात व हजारो वर्‍हाडींच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

सायंकाळी 6.52 वाजता गोरज मुहूर्तावर अक्षता पडल्यानंतर फटाक्यांची नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली. वीरशैव समाज परळीच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ताप्पा इटके गुरूजी तर सुत्रसंचलन अशोक नावंदे सर यांनी केले.अध्यक्ष महादेव इटके व वीरशैव समाज परळीचे जेष्ठ नागरिक तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहात कार्य करीत होते. परळी शहर व परिसरातील नागरिक तसेच समाज बांधवांनी नवदांम्पत्यांना शुभआशिर्वाद देण्यासाठी उपस्थिती दर्शविली होती.

अनेकांचा मदतीचा हात…
कै.नागनाथआप्पा हालगे यांचा दातृत्वाचा वारसा समर्थपणे चालवणारे त्यांचे सुपूत्र माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे यांनी वीरशैव समाज सामूहिक विवाह सोहळ्यासाठी मंगल भवन व अन्नदानाची पूर्ण जबाबदारी पार पाडली.  नंदकुमार महेशाप्पा खानापुरे यांनी वराचे ड्रेस ,सौ उमाताई व चंद्रकांता समशेटे यांनी पलंग गादी 1 नग, श्री योगेश विजयकुमारकुमार मेनकुदळे यांनी 2 कपाट ,राजाभाऊ बसाप्पा बिराजदार यांनी रोख अकरा हजार रुपये ,अशोक शिवाप्पा नावंदे सर यांनी 2 कुलर, शिवकुमार वैजनाथ आप्पा चौंडे यांनी नवरदेवाचे फेटे, श्री शाहूराव रामराव ढोबळे यांनी मनी मंगळसूत्र एक जोड, श्री महादेव दत्ताप्पा ईटके पलंग गादी एक ,वैजनाथ बाळासाहेब ईटके वधूचे शालू ,सचिन राजाभाऊ स्वामी यांनी मनी मंगळसूत्र 1 जोडी ,शिवकुमार रामेश्वर केदारी यांनी डफल बॅग 2 ,राजकुमार दिगंबर मुकदम यांच्याकडून बँड पथकाची व्यवस्था करण्यात आली, विकास नागनाथ हालगे यांनी चौरंगपाट,सुशील प्रभूआप्पा हरंगुळे यांनी वधू वरासाठी पादत्राणे ,सचिन विश्वनाथ स्वामी यांनी पुष्पहार दिले डॉक्टर सुरेश चौधरी यांनी वरांसाठी घोडे उपलब्ध करून दिले ,श्री अ‍ॅड. मनोज संकाये यांनी रुपये पाच हजाराची मदत केली.