सांदण दरी पर्यटकांसाठी बंद

सांदण दरी ही आशिया खंडातील सर्वात खोल दर्यापैकी एक आहे

अहमद नगर – भंडारदरा , एम एन सी न्यूज नेटवर्क – जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणारी सांदण दरी ही आशिया खंडातील सर्वात खोल दर्यापैकी एक असून रविवारी या भागात मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे दरीच्या तोंडाकडील भागातून मोठ्या प्रमाणात पाणी दरीत घुसले पर्यटनासाठी अगोदरच अनेक पर्यटक दरीत उतरले होते त्यांना पावसाचा अंदाज न आल्याने अनेकांची भंबेरी उडाली.

वन्य जीव विभाग आणि ग्रामस्थ त्यांनी सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे पावसाळी हंगामात पर्यटनासाठी सांदण दरी बंद ठेवणार  अशी माहिती
वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश रणदिवे यांनी दिली आहे. अंदाजानुसार वीस तारखेच्या दरम्यान भंडारदरा किंबहुना अकोला तालुक्याच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस दाखल होण्याची शक्यता असून पाऊस सुरू झाल्यानंतर पर्यटकांना सांदण दरीत पर्यटनाचा आनंद घेता येणार नाही.

छायाचित्र: अकोले माझा यांच्याकडून साभार.