बहानगा रेल्वे स्टेशन सील

◾पुढील आदेश येईपर्यंत बहानगा रस्थानकावर एकही गाडी थांबणार नाही,महत्वाचे दस्तावेज जप्त.

◾ ओडिशा रेल्वे अपघात प्रकरणी पंतप्रधानांना पत्र.

नवी दिल्ली : ओडिशा बहानाग रेल्वे अपघातामागे घातपात घडवून आणला अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशांत यापूर्वीही दहशतवादी संघटनांनी रेल्वे अपघात घडवून आणल्याच्या घटना घडल्या होत्या. ईशान्य भारत आणि जम्मू-काश्मीरमध्ये असे अपघात झाले आहेत. रेल्वे ही देशातील वाहतूक यंत्रणेची जीवनवाहिनी असून दिवसभरात रेल्वेने लाखो लोक प्रवास करतात. अशावेळी ओडिशा रेल्वे अपघात राष्ट्रीय सुरक्षा चा विषय होऊ शकतो.विविध झोन मध्ये 24 तास रेल्वे सेवा सक्रिय असते.

देशातील काही निवृत्त न्यायमूर्ती, माजी सनदी अधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ओडिशा रेल्वे अपघाताच्या अनुषंगाने राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासात अडथळे आणण्याच्या प्रयत्नांवर चिंता व्यक्ती केली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रावर अनेक  मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.तपास कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न असू शकतो आणि हे चिंताजनक आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रावर १४ माजी न्यायमूर्ती, ११५ सनदी अधिकारी, विविध क्षेत्रांतील १४१ मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, ओडिशा रेल्वे अपघाताचा तपास करणाऱ्या सीबीआयने शनिवारी बहानगा रेल्वे स्थानक सील केले. त्यामुळे आता पुढील आदेशापर्यंत या स्थानकावर एकही रेल्वे थांबणार नाही. सीबीआय अधिकाऱ्यांकडून रेल्वे स्थानकातील दस्तावेज, लॉग बुक, रिले पॅनल, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या स्थानकाजवळ २ मे रोजी दोन प्रवासी रेल्वे आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला होता.