कंत्राटदाराने चोख काम केले तर ठीक गडबड केल्यास कडक कारवाई:


संतi एकनाथांच्या पालखीचा पंढरपूर- पैठण मार्गाचे काम दिवाळीपर्यंत मार्गी लागेल – गडकरी

औरंगाबाद- एम एन सी न्यूज नेटवर्क- पैठण ते पंढरपूर हा संत एकनाथ महाराज यांची पालखी मार्ग असलेला रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी औरंगाबाद चे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. दरम्यान या मार्गावर भूसंपादना बाबतीत काही अडचणी होत्या. मात्र या बाबत काम प्रगतिपथावर असून येत्या दिवाळीपर्यंत पैठण ते पंढरपूर हा रस्ता मार्गी लागेल अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पैठण येथे औरंगाबाद- पैठण राष्ट्रीय महामार्गावरील ५१ वटवृक्षांच्या यशस्वी पुनर्लागवड प्रकल्पाची पाहणी केली.
विविध राज्यातील महामार्गावर आतापर्यंत सुमारें ६१ हजार झाडांची पुनर्लागवड केली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात जनतेचा सहभाग महत्वाचा असून वृक्ष लागवड व संवर्धनासाठी जनतेने पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे, सिने अभिनेते सयाजी शिंदे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार अशोक कुमार जैन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे रविंद्र इंगोले, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, तहसीलदार विजय चव्हाण आदी उपस्थित होते.

◾पैठण येथे ५१ झाडाचा पुनर्लागवड यशस्वी

पैठण येथे ५१ वृक्ष पुनर्लागवडचा झालेला यशस्वी प्रयोग पाहून आनंद झाला. समाजात पर्यावरण संवर्धनासाठी हा प्रयोग प्रेरणा देणारा ठरेल. असे मतं गडकरींनी व्यक्त केले. वृक्ष पुनर्लागवडीचे हे ठिकाण उद्यान म्हणून विकसित करावे त्यामुळे येथून प्रेरणा घेऊन गावागावात असे प्रकल्प उभे राहतील.