: मोसमी वाऱ्यांची रत्नागिरीत हजेरी,आकाशात ढगांची मोठी गर्दी
पुणे- एम एन सी न्यूज नेटवर्क- मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. अनेक दिवस प्रतीक्षेनंतर मान्सून रविवारी दुपारी अखेर कोकण भागातील रत्नागिरीत दाखल झाल्याची , आकाशात ढगांची मोठी गर्दी.अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
केरळात उशिराने मान्सून दाखल झाल्याने महाराष्ट्रातही मान्सून उशिरा येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. मात्र १२ जून रोजी राज्यात मान्सूनने हजेरी लावली असून कोकणातील काही भागात, दक्षिण गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश , आणि तामिळनाडू राज्याचा काही भाग व्यापलेला आहे.
◾राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस
रविवारी मान्सून दाखल झाल्यामुळे राज्याच्या विविध भागात पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. रविवारी राज्याच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. बीपरजोय वादळा मुळे समुद्र प्रचंड खवळलेला असून किनारपट्टीवर मोठ्या लाटा उसळत मान्सून दाखल झाल्यामुळे कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत.