पुणे : एम एन सी न्यूज नेटवर्क- रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे आली आहे. संसदेतील प्रश्नोत्तरे किंवा ईतर कायमच मी अनेक वर्षांपासून चांगले काम करत आलें आहे. ‘संसदरत्न’ हा पुरस्कार मला देण्यात आला आहे. त्यामुळे देशपातळीवर माझे काम आहे, कार्याध्यक्ष पद सुध्दा कामातूनच मिळालें आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांनी रविवारी पुण्यातील गांधी भवनला भेट दिली. या वेळी त्यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला वंदन केले. या वेळी युवक क्रांती दलाचे संस्थापक
आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी दत्ता बाळसराफ, विकास लवांडे, तसेच युक्रांद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवारांची मुलगी म्हणून मला कार्याध्यक्षपद देण्यात आल्याचे भाजपने म्हटले आहे. हे म्हणणे चुकीचे आहे. मी खासदार झाल्यापासून काम केलेले आहे. संसदरत्न पुरस्कार देणारे माझे वडील नव्हते. त्यामुळे मला देण्यात आलेला पुरस्कार हा माझ्या कामातून मिळाला आहे. तसेच कार्याध्यक्षपदही कामातून मिळाले आहे. लोकशाही मध्ये विरोधीपक्ष नेत्याची भूमिका मोठी असते, अजित दादांचा विरोधी पक्षनेते पदाचा रोल मोठा आहे असं ही त्या म्हणाल्या.