गोवा राज्यात सर्वच भागांत पावसाची हजेरी

मान्सून गोव्यात; गोवेकर आनंदले

गोवा पणजी: एम एन सी न्यूज नेटवर्क- मान्सून अखेर रविवारी गोव्यात दाखल झाला असून त्याच्या अगमनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे राज्यातील बहुतांशी भागांत तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहिला. पाऊस झाल्यानें राज्यातील तापमानात किंचित कमी आली आहे. प्रचंड उष्म्यामुळे उकाड्याने हैराण गोव्यात मान्सूनच्या झालेल्या आगमनाने गोवेकर जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी साधारणपणे ५ ते ६ जून पर्यंत मान्सून येतो परंतु, यंदा अरबी समुद्रात आलेल्या बीपरजोय वादळामुळे मान्सून केरळ राज्यात उशिरा दाखल झाला. त्यामुळे तो गोव्यात सुध्दा पाच ते सहा दिवस उशिराने पोहोचला

बीपरजोय वादळ गुजरातच्या कच्छ भागाला तसेच पाकिस्तानातील कराची किनारपट्टीला धडकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. देशातील किनारपट्टी भागांनाही या वादळाचा तडाखा बसण्याचा अंदाज वर्तवत हवामान विभागाने गोव्यासह इतर राज्यां इशारा दिलेला आहे. मान्सूनला झालेला उशीर आणि वातावरणातील बदलांमुळे गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील उन्हाचा पारा चढता राहिला. उकाडात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जनता घामाघून झालेली होती.

‘बिपरजॉय’चा धोकादायक भिती कायम

◾बीपरजोय चक्रीवादळ अधिक गतिमान झाले असून, पुढील तीन ते चार दिवस समुद्रात ३.५ ते ४ मीटर उंचीच्या लाटा येणार असल्याचा तसेच लहान बोटी समुद्रात घेऊन न जाण्याच्या सूचनाही हवामान विभागाने जारी केल्या आहेत. बिपरजायच्या प्रभावामुळे जोरदार वारे वाहत असल्याने समुद्र प्रचंड खवळलेला आहे.