आज मोदी सरकारच्या सहाव्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

रोजगार मेळाव्यात देशाच्या विविध भागातून अनेक केंद्रीय मंत्री सामील होणार.

दिल्ली- आज मोदी सरकारच्या सहाव्या रोजगार मेळाव्याचे आयोजन देशातील 20 हून अधिक राज्यांमध्ये 45 ठिकाणी केले जाणार आहे. त्यापैकी 70 हजार तरुणांना जॉइनिंग लेटर देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सामील होतील. यादरम्यान पंतप्रधान देशाला संबोधितही करू शकतात.

याअर्थमंत्री निर्मला सीतारामन चेन्नईहून आणि महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी लखनऊहून रोजगार मेळाव्यात सामील होतील रोजगार मेळाव्यात देशाच्या विविध भागातून अनेक केंद्रीय मंत्री सामील होणार आहेत.तर वाराणसी येथून उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे, सिकंदराबादचे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, जोधपूरचे जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि नागपूरचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाचा भाग असतील.

पंतप्रधान मोदींनी 2023 च्या अखेरीस देशातील 10 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्याचा पहिला टप्पा सुरू केला. आतापर्यंत त्यांनी तीन लाख ६२ हजारांहून अधिक लोकांना नियुक्ती पत्र दिले आहेत.