बीपरजोयचा कहर समुद्रात 8 मीटर उंचीच्या लाटा ,किनारपट्टीवर हाय अलर्ट.

गुजरात, महाराष्ट्र, गोव्यात अलर्ट, सुमारे 150 किलोमीटर प्रतितास वेगाची हवा, गुजरातच्या  दहा जिल्ह्यात अलर्ट

मुंबई- बीपरजोय चक्री वादळाचा प्रचंड वेग, सुमारे आठ मीटर उंचीच्या लाटा उसळत असून हवेचा वेग ही प्रचंड आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बीपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा मुंबई किनारपट्टी ला बसतो आहे, समुद्राच्या लाटांची उंची मोठ्या प्रमाणात वाढली आहे मुंबईत वरळी किनारपट्टीवर ही मोठ्या लाटा दिसून येत आहेत मोठ्या प्रमाणात वादळी वारे हे देखील वाहत आहे. सुमारे तीन दिवसापासून पेपर जॉय हे अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले होते कोकण किनारपट्टी पासून पहिलेही हे 840 किलोमीटर अंतर दूर असले तरी वादळामुळे हवेचा वेग तुफान वाढला आहे. वादळी हवेचे परिणाम आता कोकण किनारपट्टीवर दिसून येत आहेत. मुंबईतही जोरदार हवा वाहत असून समुद्राच्या उंच लाटा किनाऱ्यावर येऊन धडकत आहेत.

पुढील दोन दिवस समुद्र असाच खवळलेला राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गुजरात आणि नंतर पाकिस्तानच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याचे अंदाज सांगितले जात आहेत. गुजरात मध्ये ही मोठ्या प्रमाणात किनारपट्टी भागात वादळी वारे आणि पाऊस होत असल्याची माहिती मिळते आहे.

6 जूनच्या दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबायचा पट्टा निर्माण झाल्यामुळे काही तासातच बीपर जॉय चक्रीवादळ निर्माण झालं होतं. एकंदरीतच मागील आठ दिवसापासून बीपर जॉय चक्रीवादळ हे अरबी समुद्रात स्थिरावलेलं होतं,

Photo credit: shoppers vila