बंसल क्लासेस लातूर शाखेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दहावीमध्ये एकूण 100 पैकी 100 गुण घेणाऱ्या तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

लातूर/एम एन सी न्यूज नेटवर्क- : बंसल क्लासेस लातूर शाखेच्यावतीने आयोजित इयत्ता दहावी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि. 12 जून, सोमवार रोजी उत्साहात पार पडला. देशातील विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असणारे राजस्थान कोटा येथील बंसल क्लासेस विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून बंसल क्लासेस महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक मा. चंदुलालजी बियाणी सर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात बोलतांना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शिक्षण तज्ञ महेश पाटील म्हणाले की, राजस्थान कोटा येथील बंसल क्लासेस आता आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या शहरात आले आहे. आता नीट, जेईई सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आता आपल्याला राजस्थान कोटा येथे जाण्याची गरज नाही. मेट्रो सीटी तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेक संसाधणे उपलब्ध असतात परंतू आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच बंसल क्लासेसच्या उच्च व तज्ञ शिक्षकांचे मागदर्शन मिळत आहे. ही किमया घडवून आणली आहे ती मा. चंदुलालजी बियाणी यांनी आणि यासाठी त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.

इयत्ता दहावीमध्ये एकूण 100 पैकी 100 गुण घेणाऱ्या तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना मा. चंदुलालजी बियाणी सर म्हणाले की, बंसल क्लासेसने आजवर अनेक वेळा एअर वन रँक दिला आहे. यशाची ही परंपरा आजवर कायम आहे. यशाची ही परंपरा आता आपल्या महाराष्ट्रातील आणि लातूर शहरातील विद्यार्थी एअर वन रँक मिळवून पुढे नेतील. यासाठी राजस्थान कोटा येथील राष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध तज्ञ प्राध्यापक आता लातूर शहरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सेवा देणार आहेत. या संधीचा सर्व विद्यार्थी व पालकांनी फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी बंसल क्लासेस महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मा. चंदुलालजी बियाणी सर यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मा. भागवत फुंदे, बंसल क्लासेस सोलापूर-पंढरपूर शाखेचे संचालक भास्करदादा कसगावडे , चाकूर पंचायत समितीचे उपसभागपती मा. सज्जनकुमार लोणाळे, महाराष्ट्र राज्य प्रा.शि. संघ, परभणीचे सचिव मा. रणजीत मदणे, मा. ॲड. संतोषजी गिल्डा, मा. गोकुळदास चांडक सर, बंसल क्लासेस महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मा. प्रा. कैलास घुगे सर, चिफ ॲडमिनिस्ट्रटर मा. राकेश चांडक,व्हाईस स्टेट हेड मा. एस. एस. कादरी, बंसल क्लासेस लातूर-अहमदपूर शाखा संचालक मा. कौस्तूभ दैठणकर, मा. अमर मानकरी, सल्लागार मा. सचिन मालू सर, शाखा व्यवस्थापक सुदर्शन गुट्टे आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बंसल क्लासेस लातूर शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.