मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्याजवळ एका केमिकल टँकरला भीषण आग

 मुंबई- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Express Highway) लोणावळ्याजवळ एका केमिकल टँकरला भीषण आग लागली. आग धुमसल्याने वाहतूक पुन्हा थांबवली, महामार्ग पोलीसांचा निर्णय घेतला होता.

आग लागल्यावर दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दुपारी  एक च्या दरम्यान  पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक हळूहळू सोडण्यास सुरुवात झाली. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्याजवळ एका केमिकल टँकरला भीषण आग लागली. या  एक्स्प्रेसवेवरील पुलावर एक केमिकल टँकर पलटी झाला आणि त्यानं पेट घेतला. मात्र पलटी झाल्यामुळे त्याच्यातलं केमिकल पुलाखालच्या रस्त्यावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर पडलं, तसंच काही वाहनांवरही सांडलं ज्यामुळे पुलाखालील वाहनांनी पेट घेतला. दरम्यान, आग लागल्यावर दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक हळूहळू सोडण्यास सुरुवात झाली होती.