नीट परीक्षेत परळीच्या विद्यार्थ्यांचा डंका.. पलक जाजू राज्यात द्वितीय-बंसल क्लासेसचे राज्यस्तरीय यश

पार्थ कराडनेही मिळविले यश,
गुणवंत विद्यार्थ्यांचा लवकरच सत्कार-चंदुलाल बियाणी
परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- नीट (NEET) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून परळीच्या दोन विद्यार्थ्यांनी निकालाच्या माध्यमातून परळीच्या मुकूटात मानाचा तुरा रोवला आहे. येथील विद्यार्थीनी पलक जाजू ही मराठवाड्यातून प्रथम तर राज्यातून द्वितीय आली आहे. तिने 720 पैकी 705 गुण मिळवले आहेत. दरम्यान याच परीक्षेत परळी येथील पार्थ कराड या विद्यार्थ्यानेही घवघवीत यश मिळविले आहे.

राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या नीट परीक्षेत परळी येथील दोन विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. पलक श्रीकांत जाजू ही विद्यार्थीनी 720 पैकी 705 गुण घेऊन राज्यातून द्वितीय तर मराठवाड्यातून प्रथम आली आहे. याच परीक्षेत डॉ. श्री व सौ. शालीनी बालासाहेब कराड यांचा मुलगा पार्थ कराड याने 720 पैकी 680 गुण मिळविले आहेत. परळीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत प्रथमच मोठे यश मिळाले असून या यशामुळे परळीचा शैक्षणिक दृष्टीकोनातून नावलौकीक वाढला आहे. अभ्यासातील सातत्य, गुरुजनांचा अभ्यासाबाबतचा आग्रह आणि बंसल क्लासेसने दिलेले स्टडी मटेरिअल, ऑनलाईन क्लासेस हे आमच्या यशाचे गमक असल्याचे पलक जाजू व पार्थ कराड यांनी सांगीतले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा लवकरच सत्कार
बंसल क्लासेसची सुरुवात मुळ परळीपासून सुरु झाली असून नीट परीक्षेत आमच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आणि इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक आहे. पलक जाजू व पार्थ कराड या दोघांनी मिळविलेल्या यशामुळे बंसल क्लासेस उपयुक्त शिक्षणासाठी अत्यंत चांगले आहे असा विश्वास पुन्हा एकदा निर्माण झाल्याचे बंसल क्लासेसचे महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवर्तक चंदुलाल बियाणी यांनी सांगीतले. लवकरच परळी शहरात पलक जाजू व पार्थ कराड या गुणवंत विद्यार्थ्याचा भव्य-दिव्य सत्कार केला जाईल, अशी घोषणा चंदुलाल बियाणी यांनी केली. दरम्यान, पलक जाजू व पार्थ कराड या दोघांचाही बंसल क्लासेसच्या वतीने वैद्यनाथ प्रभूंची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष चंदुलाल बियाणी, संचालक माजी प्राचार्य डॉ. आर.एस.बांगड, प्रा. कैलास घुगे, तोष्णीवाल आदींसह अनेकजण उपस्थित होते.