बीपरजॉय भयंकर चक्रीवादळा ने केले प्रचंड नुकसान

▪️गुजरातमध्ये किनारी भागांत मोठी हानी झाल्याचा अंदाज
मुंबई-: भारतीय हवामान खात्याने केलेल्या भाकीतानुसार गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्र किनाऱ्यावर जाऊन धडकले.तब्बल नऊ दिवसांनंतर अरबी समुद्रात घोंगावणारे महाभयंकर बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ताशी तब्बल १४५ किलोमीटर वेगाने चक्रीवादळाने तांडव सुरू केले. ते मध्यरात्रीपर्तयं सुरूच होते. या आपत्तीत जीवित हानी झाल्याचे वृत्त नसले तरी सरकारी आणि खासगी मालमत्चते मोठी हानी केल्याचे वृत्त आहे.

ताशी सुमारें १४५ किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध् लँडफॉल सुरू झाले. गुजरातमधील द्वारका, कच्छ, सौराष्ट्र आदी किनारपट्टीवर विध्वंस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत लँडफॉल सुरूच होता. यात एकूण किती विध्वंस होईल, हे रात्री स्पष्ट नव्हते. त्यामुळे सुरक्षित स्थळी हलवलेल्या ७४ हजार नागरिकांच्या मालमत्तेचे नेमके काय झाले, आज शक्रुवारी  दिसून येईल. खबरदारीचा उपाय म्हणून गुजरात मधील आठ किनारी जिल्ह्यांमधून यापूर्वीच ७४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. चक्रीवादळाचा मोठा तडाखा कच्छच्या किनाऱ्याला तसेच देवभूमी द्वारकेला बसला आहे.त्यामुळे कच्छ किनारपट्टीतील २४० गावांतील वीजपुरवठा खंडित
करण्यात आला होता. शिवाय दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक देखील बंद करण्यात आली होती. दरम्यान, गुजरातमध्ये एनडीआरएफच्या १८ तुकड्या तैनात असून लष्कर, नौदल आणि वायुदलाचीही मदत घेण्यात आली आहे.
चक्रीवादळ धडकल्यानंतर गुजरातमध् मुसळधार पाऊस  आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला.

किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. वाऱ्याचा वेगही १२५ ते १४५ किमी इतका होता. त्यामुळे अनेक महाकाय वृक्ष कोसळले. विजेचे खांब, कच्ची घरे कोसळली. दरम्यान, राज्य सरकार आणि केंद्र सरकार सतत
या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारी म्हणून किनारी भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जीवित हानी अजिबात होऊ नये, यासाठी सरकारने अतिशय चोख बंदोबस्त ठेवला होता