रिंगण सोहळ्यास माजी मंञी आ. धनंजय मुंडे यांची विशेष उपस्थिती
परळी- एम एन सी न्यूज नेटवर्क:-परळी शहरात प्रथमच रिंगण सोहळ्याचे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या रिंगण सोहळ्यास दिनांक 17 जून 2023 रोजी परळी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धनंजय मुंडे परळी नगर परिषदेचे माजी गटनेते वाल्मीकांना कराड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून हा न भूतो न भविष्यती असा दैदीप्यमान रिंगण सोहळा परळीत प्रथमच प्रत्येकाला पाहण्याचा योग या निमित्ताने लाभणार आहे.या रिंगण सोहळ्यास परळी शहर व तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी केले आहे.
हिंगोलो तालुक्यातील नर्सी नामदेव महाराज नर्सी नामदेव संस्थान संत नामदेव पालखी दिंडी सोहळ्याचे पहिले रिंगण परळी येथे नाथ टाॅकीज रोड शासकीय गोडाऊन समोरील मैदानावर कृ.उ.बा.समितीच्या खुल्या जागेत रिंगण सोहळा होनार असून या मैदानावरील डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्यास आमदार धनंजय मुंडे, परळी नगर परिषदेचे माजी गटनेते वाल्मीकांना कराड आधीसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी पालखी दिंडी सोहळा आषाढी एकादशीला पंढरपूरला निघतो. दिंडीचे हे २८ वे वर्षे हि दिंडी दरवर्षी परळीत येत आस्ते पण याच वर्षी प्रथमच परळीत रिंगण सोहळा होनार आहे. ८ जून रोजी प्रस्थान होऊन नर्सीनामदेव नगरीत नगरप्रदक्षिणा केली, तर पुण्य लाभते. परळीत येणार्या दिंडीत रिंगणात फुगड्या,भजन, पूजन नामस्मरण तसेच पालखीचे दर्शन घेण्यासाठी 17 जुन रोजी 4 वा मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. संत जगमिञ नागा मंदिरात संध्याकाळी मुकाम मुक्कामानंतर जून 18 जुन रोजी ही दिंडी सकाळी अंबाजोगाई कडे जानार असून या दिंडी व रिंगण सोहळ्यात परळी शहर व तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा व दिंडी सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे,बीड जिल्हा महिला जिल्हाध्यक्षा सौ.राधाताई जायभाय, परळी तालुका अध्यक्ष ह.भ.प.विश्वंभर महाराज उखळीकर,परळी महिला तालुकाध्यक्षा सौ.शोभाताई भास्करराव चाटे,परळी शहराध्यक्षा सौ.सुरेखाताई विजयकुमार मेनकुदळे यांच्यासह अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांकडून रिंगण सोहळ्यास भाविक भक्तानी मोठ्या संखेने उपस्थित राहाण्याचे अव्हान केले केले आहे.