अमेरिकेनंतर भारतात गुरुत्वीय लहरीचा अभ्यासाचे केंद्र महाराष्ट्रातील औंढा नागनाथ

▪️ चार किलोमीटर लांबीचे काटकोनात असणारे दोन बोगदे द्वारे होणार गुरुत्वीय लहरींचा अभ्यास.

▪️ देशात उभारली जाणारी ही पहिलीच प्रयोगशाळा असल्यामुळे राज्य शासन आणि केंद्र शासनाचे या         प्रयोगशाळेचे उभारणीकडे विशेष लक्ष.

एम एन सी न्यूज नेटवर्क- महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यांमध्ये औंढा नागनाथ तालुक्यात दुधाळा परिसरात वैश्विक संशोधनात कलाटणी देणारी ही अत्याधुनिक प्रयोगशाळा लिगो हा उभारण्यात येणार आहे. जगातील केवळ तिसरी आणि अमेरिकेच्या बाहेरील पहिलीच प्रयोगशाळा आहे. 2019 च्या दरम्यान वन विभागाने सुमारे 121 हेक्टर जमीन हस्तांतरण केंद्राच्या वन व पर्यावरण विभागाने अनुकूलता दाखवली होती या प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने प्रकल्प उभारण्यातला अडथळा मुख्यता दूर झाला आहे. या लायगो इंडिया प्रकल्पास 2016 च्या फेब्रुवारी महिन्यातच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे, तर 2023 मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करणे शक्य असल्याचं मत अमेरिकी वैज्ञानिकांनी व्यक्त केलेल आहे. सध्या वाशिंग्टन आणि लुईझियाना मध्ये दोन प्रयोगशाळा आहेत.

महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथमध्ये लिगो आकाराला येत आहे. ‘नासा’चे वैज्ञानिक आणि भारतातून ‘डीएई’चे अधिकारी ह्यांची वर्दळ गेल्या काही वर्षांपासून ह्या भागात सुरू आहे. इथल्या जवळपासच्या लोकांना नासा काही तरी मोठा प्रोजेक्ट करत आहे इतकीच माहिती आहे; पण वैश्विक संशोधनात कलाटणी देणारी ही अत्याधुनिक प्रयोगशाळा लिगो आकार घेत आहे हे महत्त्वाचे.औंढा नागनाथ तालुक्यात दुधाळा परिसरात सुमारे 171 हेक्टर क्षेत्रावर उभारले जाणारी अमेरिकेबाहेरची पहिलीच प्रयोगशाळा आहे. गुरुत्वीय लहरीचा अभ्यास या प्रयोगशाळेच्या माध्यमातून करण्यात येणार असून यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ शास्त्रज्ञ असणार आहेत.

लिगो म्हणजेच (Laser Interferometer Gravitational-Wave Observatory.)

लिगो म्हणजे नक्की काय, हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी ग्रव्हिटेशनल वेव्ह (गुरुत्वीय लहरी) समजून घ्यावी लागेल. विश्वात अशा अनेक घटना घडत असतात, की ज्या माणसाच्या कल्पनेच्या पलीकडल्या आहेत. एकूणच विश्वाची निर्मिती आणि त्यात असलेल्या अनेक गूढ गोष्टी यांबद्दल अजूनही बरेच संभ्रम आणि तोकडे ज्ञान आहे. २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शोधाची अनेक नवीन दालने उघडी झाली आहेत. त्यातील एक दालन म्हणजेच लिगो.

गेल्या शतकात विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन ह्यांनी भाकीत केले होते, की जेव्हा वैश्विक घटना म्हणजे कृष्णविवरांचे (Black Holes) मीलन किंवा न्यूट्रॉन ताऱ्यांची टक्कर अशा घटना घडतील तेव्हा स्पेस-टाइममध्ये त्यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड गुरुत्वीय बलामुळे लहरी तयार होतील. नदीच्या पाण्यात दगड टाकल्यावर जसे पाण्यात तरंग निर्माण होतात, त्याच पद्धतीने ह्या लहरी तयार होऊन विश्वाच्या पोकळीत प्रवास करतील. जेव्हा ह्या लहरी ग्रह-ताऱ्यांना आदळतील तेव्हा स्पेस-टाइममध्ये विश्व जेलीच्या बॉलसारखे आकुंचन आणि प्रसरण पावेल. ते ज्या लहरींनी होईल त्यांना गुरुत्वीय लहरी असे म्हटले गेले.