धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार गो. पी. लांडगे यांना परिषदेचा उत्कृष्ट प्रसिध्दी प्रमुख पुरस्कार जाहीर

मुंबई : एम एन सी न्यूज नेटवर्क- धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार गो. पी. लांडगे यांना यंदाचा स्व. संतोष पवार उत्कृष्ट जिल्हा प्रसिद्धी प्रमुख  पुरस्कार जाहीर झाला आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी  ही घोषणा केली..
मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची  ऑनलाईन दिनांक :१७ जून २०२३ रात्री ८:०० च्या बैठकी दरम्यान त्यांची निवड झाली.. राज्यातील 35 जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांपैकी 32 जिल्ह्यातील प़तिनिधी बैठकीस हजर होते..
राज्यभरातील प़सिध्दी प्रमुख हे परिषदेचे कान व डोळे आहेत.. त्यामुळे त्यांच्या कार्याची राज्यपातळीवर नोंद घेतली जावी यासाठी संतोष पवार यांच्या नावे दरवर्षी एका प्रसिद्धी प्रमुखास सन्मानित करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.. पहिल्याच वर्षी गो. पी. लांडगे यांना हा पुरस्कार दिला जात आहे..
गो. पी. लांडगे हे गेली 50 वर्षे परिषदेशी जोडलेले आहेत..परिषदेचे उपाध्यक्ष आणि परिषदेचे धुळे – नंदूरबार प्रसिद्धी प्रमुख म्हणून ते सध्या काम करीत आहेत.. परिषदेच्या प़त्येक बातमीला स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळवून देण्याबरोबरच परिषदेची प्रतिमा उज्ज्वल करण्याचे ते काम करतात..परिषदेच्या प्रत्येक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो.. त्याबद्दल त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 23 जून 2023 रोजी रोजी मुंबईत गौरविण्यात येणार आहे..
एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस मन्सूरभाई शेख,कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कोषाध्यक्ष विजय जोशी राज्याचे सहाय्यक प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी व सर्व राज्यातील जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी आदी मान्यरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे..