विठ्ठल- रुक्मिणी मंदिर चोवीस तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय

पंढरपूर-एमएनसी न्यूज नेटवर्क- देशभरात विठ्ठलभक्तांची संख्या मोठी असून पंढपूरमधील विठ्ठल रखुमाईचे मंदिर हे वारकरी संप्रदायाचे व विठ्ठलभक्तांसाठी आराध्य दैवत आहे.  विठ्ठल रखुमाईचे मंदिर आजपासून 24 तास खुले राहणार आहे.

आषाढी वारीनिमित्त मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

विठ्ठल रखुमाईचे पदस्पर्श आणि मुखदर्शन जास्तीत जास्त भाविकांना घेता यावे यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला. आषाढी वारीनिमित्त पंढपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची आणि भाविकांची संख्या लाखांमध्ये असते. आषाढी वारी संपेपर्यंत देव झोपायला जात नाहीत अशी प्रथा आहे. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी मंदिर चोवीस तास खुले ठेवण्यात येणार आहे.

◾ मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

साधारणपणे सामान्य दिवशी विठुरायांची पहाटे सकाळी 4 वाजल्यापासून पूजाअर्चना होते. आणि रात्री 11.30 वाजता पूजा होते. त्यानंतर मंदिर बंद राहते. मात्र, देवाचा पलंग काढल्यामुळे नित्याच्या पूजाअर्चना बंद राहणार आहेत. या वेळेचा भाविकांना उपभोग घेता यावा यासाठी मंदिर प्रशासनाने विठ्ठल- रुक्मिणी मंदिर चोवीस तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.