शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वारकऱ्यांना मेडिकल किट व अत्यावश्यक वस्तूंचे वितरण

उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर व जिल्हा समन्वयक युवासेना प्रा.अतुल दुबे यांचा उपक्रम

परळी -वैजनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क –  पंढरपूर कडे आषाढी वारीनिमित्त जाणाऱ्या वारकऱ्यांना परळी वैजनाथ येथे आल्यानंतर मेडिकल किट व दैनंदिन अत्यावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.19 जुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वर्धापन दिनानिमित्त हा विशेष उपक्रम उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर व युवासेना जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे यांच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी परळी शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिंडीचे प्रमुख संदीप शास्त्री महाराज यांचाही शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

19 जुन रोजी शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वारकऱ्यांना आरोग्य किट आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. संत जगमित्र मंदिर येथे हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी बोलत असताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की, वारकरी पंढरपूरच्या दिशेने शेकडो किलोमीटर पायी जात असतात. पांडुरंगाच्या भक्तीची ओढ त्यांना तहान – भूक विसरायला लावते. अशातच तो खडतर प्रवास पूर्ण करतांना त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात. त्यांच्याकडे साहजिकच दैनंदिन आवश्यक असलेली औषधी उपलब्ध नसते. ही बाब लक्षात घेऊनच किरकोळ आवश्यक असणारी औषधी, गोळ्या, साबण, डोक्याचे तेल, झेंडू बाम इत्यादी वस्तूंचा समावेश असलेले किट वारकऱ्यांना भेट देण्यात आल्याचे अभयकुमार ठक्कर म्हणाले. या उपक्रमाच्या आयोजन प्रसंगी युवा सेना विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, माजी शहर संघटक संजय कुकडे, उपशहर प्रमुख किशन बुंदेले, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख, संजय सोमाने, शिवाजी नगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी, मनिष जोशी, प्रकाश देवकर, नवनाथ वरवटकर, योगेश जाधव, सूरज देवकर, योगेश घेवारे, अशोक चव्हाण, लक्ष्मण मुंडे, सागर चव्हाण, रघुनाथ बोले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.