कु.पलक जाजु हीचा होणार सत्कार
सिने अभिनेते भरत जाधव यांची प्रमुख उपस्थिती, प्रसिद्ध वक्ते जयप्रकाशजी काबरा यांचे मार्गदर्शन.
लातूर- एम एन सी न्यूज नेटवर्क –
बंसल क्लासेसच्या वतीने नीट परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा महागुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उद्या गुरुवार दि.22 जून रोजी मधुमिरा फंक्शन हॉल येथे सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे. सदर सोहळा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अभूतपूर्व सोहळा ठरणार असून संपूर्ण महाराष्ट्रभरातून विद्यार्थी, पालक व बंसल क्लासेसच्या सहकार्यांची उपस्थिती असणार आहे. प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असून प्रसिद्ध प्रेरक वक्ते जयप्रकाशजी काबरा यांचे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. राज्यातून नीट परिक्षेत राज्यातून द्वितीय व मराठवाड्यातून प्रथम आलेल्या कु.पलक श्रीकांत जाजू हिच्यासह गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.
नीट परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून बंसल क्लोससच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा डंका वाजवला आहे. राज्यातून मुलीमध्ये द्वितीय व मराठवाडयातून प्रथम येण्याचा मान परळी येथील कु.पलक जाजू हिने मिळविला आहे. एवढेच नाही तर राज्यभरात बंसल क्लासेसच्या शाखेतून अनेक विद्यार्थी नीट परिक्षेत मोठया गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत. राजस्थान कोटा येथे गेली अनेक वर्षे बंसल क्लासेसने योग्य मार्गदर्शन, सराव, नियोजनाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी घडवले आहेत. याच उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखण्याची जिद्द घेऊन बंसल क्लासेसने महाराष्ट्रात पदार्पण केले. पहिल्याच वर्षी बंसल क्लासेसच्या पलक जाजू या विद्यार्थिनीने 705 गुण प्राप्त करून मराठवाड्यातून प्रथम तर महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. जाजू हिचे यश सर्व शिक्षक व क्लासेसच्या योग्य मार्गदर्शनाचे द्योतक आहे. तसेच या पहिल्याच वर्षी क्लासमधील 50 हून अधिक विद्यार्थ्यांनी 600 हून अधिक गुण प्राप्त केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान व कौतुक करणे आवश्यक असल्याने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यातील विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव, कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम अभिनेते कमलाकर सातपुते, लागिर झालं जी मालिका फेम अभिनेते निखिल चव्हाण यांची विशेष उपस्थिती असणार आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभर जिद्दीने व अथक परिश्रमाने परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले असून त्यांची सिनेसृष्टीबाबत असलेली जिज्ञासा लक्षात घेत प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार आहेत. यासोबतच पुढील आयुष्यात विद्यार्थ्यांना अधिक भरीव यश संपादन करण्याची प्रेरणा व योग्य दिशा प्राप्त व्हावी यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक जयप्रकाश काबरा यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. काबरा यांनी देश-विदेशात 5 हजारांहून अधिक कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले असून त्यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल.
गेली वर्षभर विद्यार्थी परीक्षा व अभ्यासाच्या तयारीत असल्याने त्यांना घवघवीत यश प्राप्त झाले. याच यशाचे कौतुक करणे क्रमप्राप्त असल्याने सदर सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास बंसल क्लासेसचे एमडी अँड सीईओ समीर बंसल, राजस्थान कोटा येथील बंसल क्लासेसचे केमिस्ट्री विभागप्रमुख तथा प्रसिद्ध प्राध्यापक प्रिन्स सिंग सर, कोटा येथील बंसल क्लासेसचे गणित विभागप्रमुख रवी प्रताप सिंह, एचआर हेड स्पर्श द्विवेदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या महागुणगौरव सोहळ्यास सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसह उपस्थित राहण्याचे आवाहन बंसल क्लासेस महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक चंदूलाल बियाणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच या सोहळ्यास बंसल क्लासेस महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रामेश्वर बांगड, उपाध्यक्ष कैलास घुगे, उपाध्यक्ष पूजा बियाणी, स्टेट हेड विष्णू घुगे, चीफ अड्मीनिस्ट्रेइटर राकेश चांडक, व्हाईस स्टेट हेड एस.एस.कादरी, व्हाईस स्टेट हेड सत्यजित हैबते आदींची उपस्थिती आहे.
……………………………………… ……………..
जयप्रकाशजी काबरा यांचे विशेष मार्गदर्शन
लातूर येथे होत असलेल्या बंसल क्लासेसच्या महागुणगौरव कार्यक्रमात प्रसिद्ध वक्ते जयप्रकाशजी काबरा यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम आणि परिक्षा यावर ते मार्गदर्शन करणार आहेत. राज्यभरात प्रेरक वक्ते म्हणून त्यांचा गौरव केला जात असून विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाची संधी मिळणार आहे.