शिर्डीत दोन महिन्यात 47 कोटींची देणगी, लाखो भाविकांनी घेतले साईबाबांचे दर्शन

22 लक्ष लोकांनी महाप्रसाद चा लाभ,
भक्तांची ऑनलाईन देणगी सुमारें 3 कोटी रुपये.

अहमदनगर- शिर्डी- एमएनसी न्यूज नेटवर्क– सबका मालिक एक देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या दर्शनासाठी गत दोन महिन्यांमध्ये २५ एप्रिल ते १५ जून २०२३ एवढ्या कालावधीत देशभरातील आणि विदेशातील सुमारे २६ लाख भाविकांनी शिर्डीत दर्शनासाठी भेट दिली. या भाविकांनी सुमारे ४७ कोटी ७९ लाख रुपयांचे दान साईंच्या झोळीत अर्पण केले आहे. विशेष रकमेच्या दर्शन पास आणि आरतीद्वारे ११ कोटी ५५ लाख रुपयांचे उत्पन्न संस्थानला मिळाले. मागील वर्षी याच काळात भाविकांनी ५५ कोटींचे दान दिले होते.

भेट देण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत थोडी कमी होण्यास या वर्षीची उन्हाची प्रचंड तीव्रता ही कारणीभूत आहे .भाविकांची गर्दी काहीशी कमी असल्याने एकूणच देणगीत सुध्दा काही प्रमाणात काही कोटींची घट झाल्याचे समजते.

शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज लाखो भाविक शिर्डीत येत असतात. दर्शनाच्या साठी विशेषतः दक्षिण भारतातून अनेक गाड्या शिर्डीला नियमित रूपात कनेक्टिव्हिटी देत आहेत. भाविक भक्तांनी मंदिराला दिलेल्या भेटवस्तू आणि त्यांच्या देणगीतून संस्थान भाविकांसाठी विविध सुविधा निर्माण करते. आतापर्यंत अत्याधुनिक रुग्णालये, शैक्षणिक संकुल, प्रसादालय, भक्तनिवास उभारले आहेत. २१८ कोटी खर्च करून शैक्षणिक संकुल आणि १०९ कोटी खर्चून तीनमजली वातानुकूलित दर्शन रांग प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे.