आत्मलिंग शेटे यांची निवड

परळी; एमएनसी न्यूज नेटवर्क- परळी येथील विरशैव समाजाचे युवा नेते तथा परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांची लिंगायत संघर्ष समितीचे महाराष्ट्राचे समन्वयक लोकनेते मा.काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली व लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनीलशेठ रुकारी यांच्या आदेशावरुन प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र (आबा) मुंडे यांनी लेखी नियुक्ती पत्र देऊन लिंगायत संघर्ष समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे.

आत्मलिंग शेटे हे पुर्वीपासूनच लिंगायत संघर्ष समितीचे जिल्हा समन्वयक होते. त्यांची सामाजिक कार्याची आवड व कार्य असल्यामुळे त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली असल्याचे मा.काकासाहेब कोयटे यांनी दुरध्वनी वरुन बोलतांना सांगितले व आत्मलिंग शेटे यांचे अभिनंदन केले.

आत्मलिंग शेटे विरशैव लिंगायत समाजामध्ये गेली 20 वर्षापासून ते कार्यरत आहेत. लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने परळी येथे दि. 15/7/2014 ला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी भव्य मोर्चा काढला होता.