धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघात विविध कुटुंबांच्या सांत्वनपर भेटी

आपेट, मोरे, नागरगोजे, चाटे आदी कुटुंबांचे केले सांत्वन

परळी वैद्यनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क – परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातील कौटुंबिक दुःख कोसळलेल्या आपेट, मोरे, नागरगोजे, चाटे आदी कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली व त्यांचें  सांत्वन केले.

गिरवली बा. येथील सचिन आपेट यांच्या बंधूंचे नुकतेच निधन झाले होते, बर्दापूर येथील बंडू नाना मोरे यांच्या बंधूंचे नुकतेच निधन झाले होते, नागदरा येथील गौतमबापु नागरगोजे यांचे नुकतेच निधन झाले होते, कुसळवाडी येथील अशोक चाटे यांच्या मातीश्रींचे निधन झाले होते, या परिवारांची आ. धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.