जालन्यात पावसाची हजेरी, रिमझिम बरसला.

जालना एम एन सी न्यूज नेटवर्क- शहर आणि परिसरात दिनांक 23 रोजी रात्री रिमझिम पावसाने हजेरी लावली जून महिना सुरू झाल्यापासून शहरात पावसाचा थेंब नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. दरम्यान हा पाऊस बदनापूर तालुक्यात ही रिमझिम स्वरूपात बरसल्याची माहिती मिळते आहे.

रात्री साडे नऊच्या सुमारास जालना शहर आणि परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून नागरिकांची काही काळ का होईना सुटका झाली. सायगाव शिवारात तसेच डोंगरगाव  परिसरात पावसाचा आगमन झाला असून हा पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा आहे.

पेरणीसाठी हा पाऊस तेवढा महत्त्वाचा नाही परंतु जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दिलेल्या दग्यामुळे आज कोसळलेल्या पावसाने बळीराजाच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.