◾ धरणात सुमारें २० ते २३% पाणी
औरंगाबाद- एम एन सी न्यूज नेटवर्क- मे महिन्याच्या अखेर किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणामध्ये बऱ्यापैकी 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता परंतु पाणी चोरी, मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन या काराणामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.मान्सूनच्या विलंबामुळे अनेक धरणांनी तळ गाठला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चार टक्क्यांनी पाणीपातळी कमी झाली असून प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा फटका हि बसला आहे. मान्सून अधिक लांबला तर पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात मान्सूनच्या विलंबामुळे मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. तर उर्वरित धरणांतील पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे. जून महिन्यापर्यंत सहाही विभागांत असलेल्या धरणांची पाणी पातळी सुमारें २० ते २३% टक्क्यांवर आली असून मागील वर्षाच्या तुलनेत अधीक आहे.
राज्यात जलसंपदा चे जे विभाग आहेत त्यांत अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर आणि नाशिक, पुणे असे सहा प्रादेशिक विभाग आहेत.या विभागांत २ हजार ९८९ मोठी धरणे आहेत, याशिवाय माती बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, तसेच छोटे-मोठे तलाव आहेत. मागील दोन वर्षांत मान्सून उशिरा सक्रिय झाला असला तरी पाऊस मात्र सरासरीपेक्षा अधिकच झाला आहे.अनेक ठिकाणी पिण्यासाठी राखून ठेवलेले पाणी मोठ्या प्रमाणात असून नदीपात्रात पाणी सोडायला हरकत नाही या कारणानेही धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे एकंदरीतच पाणी साठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे.
काही धरणांनी गाठला तळ, तर काही धरणातील पाणीसाठा २० ते २३%
राज्यातील काही मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. प्रामुख्याने मराठवाड्यात माजलगाव, मांजरा,उजनी, आणि ईतर विभागात कोयना, दूधगंगा, राधानगरी, तिसगाव, रोशनपुरी, सिरसमार्ग, खिराडपुरी, लिंबाला, मदनसुरी, राजेगाव, सीना कोलेगाव, बिंडगिहल, कारसा पोहरेगाव, खुलगापूर, साई, धामणी, बावनथडी, शिरपूर, नंद, भावली, चणकापूर, दरणा, कारंजवण, वैतरणा, वाघड, वाकीडॅम, तिल्लरी (धामणी), तुळसी, नीरा-देवघर, डिंभे, चासकमान, पिंपळगावजोगे, वडज, माणिकडोह, घोड, पवना, भाटघर, पानशेत, वरसगाव, गुंजवणी, टेमघर, मुळशी टाटा, लोणावळा टाटा, वालवण टाटा, वारणा, धोम बलकडी, धोम,आदी धरणांचा समावेश आहे.
