मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार पत्रकार प्रकाश बाळ जोशीं यांना

मुंबई- एम एन सी न्यूज नेटवर्क- मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी एका ज्येष्ठ, मान्यवर पत्रकाराचा बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 25 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.. यावर्षी ज्येष्ठ पत्रकार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रकाश बाळ जोशीं यांना काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला..

प्रकाश जोशी यांनी पुरस्काराची 25 हजार रूपयांची रक्कम परिषदेच्या कार्यासाठी परत दिली.. 25 हजारांचा हा चेक मा. नितीन गडकरी यांनी एस.एम.देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला..