◾परळी तालुकाध्यक्षपदी अंकुश जाधव तर शहराध्यक्षपदी संदीप काळे यांची निवड
◾तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या परळी तालुकाध्यक्षपदी श्रीराम लांडगे तर शहराध्यक्षपदी अमोल सूर्यवंशी
परळी वैद्यनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क -मराठा सेवा संघाच्या परळी तालुकाध्यक्षपदी अंकुश जाधव तर शहराध्यक्षपदी संदीप काळे यांची निवड करण्यात आली आहे. तर तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या परळी तालुकाध्यक्ष पदी श्रीराम लांडगे तर शहराध्यक्षपदी अमोल सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. तसेच मराठा उघोग कक्षाची तालुक्याची धुरा युवा उद्योजक विठ्ठल साबळे यांच्याकडे देण्यात आली आहे. या प्रसंगी मराठा सेवा संघाच्या विविध कक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीही करण्यात आल्या. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दि.25 जुन 2023 रोजी मराठा सेवा संघ परळी तालुक्याची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक चेंबरी गेस्ट हाऊस येथे संपन्न झाली. यावेळी मराठा सेवा संघ प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, जागृती मल्टी स्टेटचे चेअरमन गंगाधर शेळके,जिल्हा कार्याध्यक्ष संजय देशमुख, जिल्हा सचिव सचिन शेंडगे आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम जिजाऊ वंदना घेऊन उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन शिवस्वागत करण्यात आले.
मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री अर्जुन तनपुरे मार्गदर्शन करताना म्हणाले की, आजच्या काळात तरुणानी मराठा सेवा संघाच्या चळवळीत आणने व चळवळीचे महत्त्व समझविण्यासाठी मराठा सेवा संघाच्या कार्यशाळा घेणे आवश्यक आहे. मराठा सेवा संघ बहुजन समाजाचे प्रबोधन करण्याचे काम गेली अनेक वर्ष करतोय ही खुप समाधानाची बाब असुन येणारा काळात तरुणाना फक्त मराठा सेवा संघाच्या शिव-फुले-शाहु-आबेंडकर-खेडेकर यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम करतील. परळी तालुक्यात मराठा सेवा संघ चांदा पासुन ते बांद्या प्रयत्न पोचविण्या काम स्थानिक पदाअधिकारी यांच्या वर सोपवित असल्याचे जवाबदारीपुर्वक आदेश त्यांनी दिला.
प्रास्ताविक अंकुश जाधव केले. तर मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष अशोकजी ठाकरे यांनी मराठा सेवा संघाचे सभासद, अजिवन सभासद, जिजाऊ सृष्टी निधी, याबाबत केंद्रीय कार्यकारीतील विविध ठरावाची माहीती देऊन परळी तालुक्यातुन जास्तीत जास्त निधी व सभासद देण्याचे लक्ष दिले पाहिजे. अशा सूचना तालुका कार्यकारणीला केल्या. जिल्हा कार्याध्यक्ष इंजि.संजय देशमुख यांनी जास्तीत जास्त सभासद आणि सर्वात जास्त जिजाऊ सृष्टीत निधी देण्याचे अश्वासन देऊन येणार्या काळात मराठा सेवा संघाचे शिव-फुले-शाहु-आबेंडकर-खेडेकर यांचे विचार सर्वसामान्याच्या घरोघर पोहचवु असा संकल्प व्यक्त केला. तसेच संजय सुरवसे म.से.सं तालुका व शहर परळी चा कार्यआहवाल सादर करुन म.से.संघाचे विचार शहर व तालुका परळी.वै.घरोघर पोहविण्याच सदैव तत्पर राहु असे अभिवचन दिले. मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक जागृती मल्टीस्टेट चे चेअमन आदरनिय-सम्मानिय शिवश्री प्रा.गंगाधर शेळके यांनी बहुजन समाजानी मराठा सेवा संघाचे शिव-फुले-शाहु-आबेंडकर यांचे विचार अंगिकारणे काळाची गरज असुन वेळोवेळी मराठा सेवा संघा कार्यक्रम घेऊन बहुजन समाजातील नवयुकांना प्रबोधन चळवळीत आणने खुप आवश्यक आहे असे आव्हान केले. उपस्थितांचे आभार इश्वर (जिजा) सोनवणे यांनी मानले. यावेळी मराठा सेवा संघाच्या विविध कक्षाचे पदाअधिकारी संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव, संभाजी ब्रिगेडचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे, रमाकांत शिंदे, यशवंत पवार, संभाजी आमले, राजेभाऊ काळे आदी उपस्थित होते.
◾मराठा सेवा संघाच्या विविध कक्ष
पदाधिकाऱ्यांच्या निवडी पुढील प्रमाणे
जिल्हा अध्यक्ष अशोक ठाकरे यांनी मराठा सेवा संघाच्या विविध कक्षाच्या कार्यकारी जाहीर केल्या यात पद्मश्री विठ्ठलराव विखे कृषी परीषद जिल्हा अध्यक्षपदी- ईश्वर (जिजा) सोनवणे, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्षपदी-अंकुश जाधव, मराठा सेवा संघ शहर अध्यक्षपदी- संदीप काळे, मराठा सेवा संघ तालुका कार्याध्यक्षपदी-हनुमंत इंगळे, मराठा सेवा संघ तालुका सचिवपदी- राजेश पवार, मराठा सेवा संघ शहर उपाध्यक्षपदी- पि.एच.यादव , सयाजी गायवाड न्यायदान कक्ष तालुका अध्यक्षपदी- अँड. प्रदीपजी गिराम, जिजाऊ ब्रिगेड शहर अध्यक्षपदी- पुजाताई काळे, पद्मश्री विठ्ठलराव विखे कृषी परीषद तालुका अध्यक्षपदी-सुंदर आमले ,विर भगतसिंह विघार्थी परीषद शहर अध्यक्षपदी- स्वप्नील वानखडे, तानुबाई बिर्जे पञकार परीषद तालुका अध्यक्षपदी- श्रीराम लांडगे, तानुबाई बिर्जे पञकार परीषद शहर अध्यक्षपदी- अमोल सुर्यवंशीजगदगुरु तुकोबा साहीत्य परीषद तालुका अध्यक्षपदी- केशव कुकडे, संगित सुर्य केशवराव भोसले क्रिडा व कला कक्ष तालुका अध्यक्षपदी- महेश होनमाने, शहर अध्यक्षपदी- दिनेश कदम, मराठा उघोग कक्ष तालुका अध्यक्षपदी-विठ्ठल साबळे, आदीची निवड करण्यात आली.