केज तालुक्यातील जवान उमेश मिसाळ शहीद

बीड- केज -एम एन सी न्यूज नेटवर्क- तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. सुरतगड येथे देशसेवा बजावत असताना २६ जून रोजी ते शहीद झाले आहेत.

केज तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ते २५ मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियन मध्ये सुरतगढ येथे सेवारत होते. त्यांचे दि. २६ जून रोजी सकाळी निधन झाले. दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाले होते.सुभेदार सुधाकर कुटाळ व त्यांचे सहकारी शहीद उमेश यांचे पार्थिव घेऊन आज दि. २७ जून रोजी रात्री ११:०० नंतर दिल्ली येथून विमानाने पुणे येथे येणार आहेत.

२८ जून रोजी त्यांच्या मूळगावी केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे शहीद जवान उमेश मिसाळ यांचा  अंत्यसंस्कार शासकीय इतमामात पार पडणार आहे.