मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब केली विठ्ठलाची शासकीय पूजा

मानाचे वारकरी मंगल भाऊसाहेब काळे, भाऊसाहेब मोहनीराज काळे मु पो. वाकडी , ता. नेवासा

सोलापूर – पंढरपूर -एमएनसी न्यूज नेटवर्क -आषाढी एकादशीबद्दल विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी सहकुटुंब विठ्ठल मंदिरात दाखल झाले.

एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये शासकीय महापूजा केली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी महापुजा झाल्यावर सहकुटुंब सहपरिवार महापुजा केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि वर्षभरात झालेल्या घडामोडी आणि राजकारण घडत असताना विठ्ठल पाठीशी आहे, अशी भावना व्यक्त केली.

महापूजा मानाचे वारकरी-भाउसाहेब मोहनीराज काळे (वय 56),मंगल भाऊसाहेब काळे (वय 52) मु पो. वाकडी, ता. नेवासा, जिल्हा-अहमदनगर, 25 वर्षापासून भास्कर गिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी, व्यवसाय – शेतकरी