राम कृष्ण हरी चा गजर करीत वारकरी पंढरपूर कडे रवाना

राधा मोहन साठी प्रतिष्ठानच्या वतीने प्रवास सुविधा

परळी -एमएनसी न्यूज नेटवर्क- प्रतिनिधी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अनेक वारकरी आज श्रीक्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाले. परळी रेल्वे स्थानकावर राधा मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी सर्व वारकऱ्यांना सत्कार करून शुभेच्छा देत प्रवासासाठी रवाना केले. मागील वीस वर्षापासून हा उपक्रम बियाणी परिवार राबवीत असून दरवर्षी उत्साही वारकरी या प्रवास सुवीधेचा लाभ घेत असतात.

आषाढी एकादशीच्या वारीच्या निमित्ताने आज परळी येथील रेल्वे स्थानकावरून अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले रेल्वे स्थानकावर या उपक्रमाचे संयोजक तथा राधा मोहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी संयोजकाच्या वतीने वारीसाठी सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा शाल श्रीफळ व वैष्णवांची धर्म पताका देऊन सत्कार करण्यात आला संयोजकाच्या वतीने सहभागी वारकऱ्यांना फराळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती परळी मिरज रेल्वेने प्रवासासाठी सुरुवात करतात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी राम कृष्ण हरी चा एकच गजर केला .

या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकाला वारकऱ्यांच्या सहभागामुळे वारीचे स्वरूप प्राप्त झाले होते वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह सहसंयोजक ओमप्रकाश बुरांडे प्रकाश वर्मा , धनराज कुरील, रवींद्र परदेशी ,दत्ता सावंत, आनंद हडबे,यांच्यासह विश्वजीत कांबळे, जगन्नाथ रामदासी, सुरज, आदीं सहभागी झाले होते.