विठ्ठला ..तुच खरा शिल्पकार…जगाचा आणि आम्हा कलावंतांचाही…प्रमोद कांबळे

पहावा विठ्ठल…

मुंबई- आषाढी एकादशी…मुंबईतील षण्मुखानंद सभागृह तुडुंब गर्दीने भरलेले… महेश काळे यांची गान मैफल रंगलेली, विठू नामाचा महिमा, अभंग, भक्तीगीते यात दंग झालेले सभागृह, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे ओघवते सूत्रसंचालन आणि त्याचवेळी माझं विठ्ठलाचे लाईव्ह शिल्प साकारताना तल्लीन होणे… पूर्ण समर्पित होऊन विठ्ठल साकारताना देहभान हरपून गेले होते…शिल्प पूर्ण झाले आणि टाळ्यांच्या कडकडाटात मला पांडुरंगाचे दर्शन झाले…

मुंबईकरांनी माझ्या कलेला उत्स्फूर्त दाद दिली. मी स्वतः विठ्ठलाच्या सगुण साकार रूपाकडे एकटक पाहत राहिलो… मनात म्हणालो, विठ्ठला शिल्प घडवायला तूच प्रेरणा दिली, तुच खरा शिल्पकार…जगाचा आणि आम्हा कलावंतांचाही…

प्रमोद कांबळे, चित्र शिल्पकार, नगर.