पूजा बियाणी – राठी यांची मुलाखत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर प्रदर्शित

मुंबई- एम एन सी न्यूज नेटवर्क– ‘बियाणी पर्व – शैक्षणिक सेवेची यशोगाथा’ या सत्रात जय महाराष्ट्र चॅनेलवर बंसल क्लासेसच्या उपाध्यक्षा पूजा बियाणी यांची मुलाखत प्रसारित झाली. यात बियाणी कुटुंबाच्या विविध आस्थापनाची माहिती त्यांनी विशद केली.

युवा पिढीला योग्य मार्गदर्शन केल्यास व योग्य संधी उपलब्ध करून दिल्यास त्यांचा यशस्वी बनण्याचा मार्ग सुखकर बनतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच बंसल क्लासेस,क्युरीअस किड्स, राजस्थानी मल्टीस्टेट, दैनिक मराठवाडा साठी या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून देत असून अधिकाधिक युवकांनी आपले कौशल्य सिद्ध करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या मुलाखतीमध्ये बंसल क्लासेस व क्युरीअस किड्स फ्रेंचाईजी घेणे बाबत मार्गदर्शन, या अस्थापनांची कार्यप्रणाली आणि त्यांचे पुढील ध्येय या बाबत सखोल चर्चा करण्यात आली. संबंधित मुलाखत जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीच्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षक परत पाहू शकणार आहेत.