पेरू गेट पोलीस चौकीला कुलूप लावून बाहेर गेले प्रकरणात तीन पोलीस निलंबित

मध्यवस्तीतील पोलीस चौकी भरदिवसा बंद कशी? हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटनांचा  सवाल .

पुणे : एमएनसी न्यूज नेटवर्क-  महाविद्यालयीन तरुणीवर पुण्याच्या सदाशिव पेठेत  मंगळवारी (दि. २५) भरदिवसा झालेल्या हल्ल्यासंदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन पोलीस शिपायांना तडकाफडकी निलंबित केले. पेरूगेट पोलीस चौकीत नेमणूक असताना, चौकीला कुलूप लावून निघून गेल्याने त्यांच्यावर ही कारवाई केली. दरम्यान, शहरातील सर्व पोलीस चौक्या २४ तास चालू ठेवून, महिलांबाबतचे गुन्हे रोखण्यासाठी ‘दामिनी पथकांची संख्या दुप्पट करण्यात येणार आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या हल्ल्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेतली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, समाजाच्या विविध स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्याबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

शहराच्या मध्यवस्तीतील पोलीस चौकी भरदिवसा बंद कशी, असा सवाल हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केला. त्याबाबत, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गेले दोन दिवस वरिष्ठ स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकींचा सपाटा लावला आहे.पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. पेरुगेट पोलीस चौकीत नेमणूक असताना ती कुलूप लावून निघून गेलेल्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन पोलीस शिपायाना निलंबित करण्याचा आदेश त्यांनी बुधवारी (दि. २६) जारी केले.

त्यांची विभागीय चौकशी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकान्यांकडून सुरू.