बुलढाणा-सिंदखेडराजा- समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात बुलढाण्यातील सिंदखेड राजा नजीक पिंपळखुंटा गावी अपघात अपघातात २५ प्रवाशांच्या जागी जागीच होरपळून मृत्यु.
बुलढाणा- सिंदखेडराजा- एमएनसी न्यूज नेटवर्क– समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसला मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास अपघातात झाल्याची प्राथमिक माहित.अपघातात बसला आग लागल्याची घटना घडली आहे. झालेल्या या अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बस मध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील सात प्रवासी सुखरूप बाहेर पडले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ पिंपळखुटा गावा जवळ हा अपघात झाला.
समृद्धी महामार्गावर ही बस नागपूरहून पुण्याकडे येत होती. बस मध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावरून जात असताना बस दुभाजकाला धडकली, त्यानंतर बसने पेट घेतला. बस मध्ये असणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. बस पलटी झाल्याने बसचा दरवाजा हा खालच्या भाग बाजूला आला त्यामुळे प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
बसचा दरवाजा खाली आल्याने कोणालाही बाहेर पडता आले नाही
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर ते औरंगाबाद या मार्गावर बस प्रथम उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी खांबाला धडकली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या मधोमध असलेल्या काँक्रीटच्या दुभाजकाला धडकल्याने बस पलटी झाली. बस डावीकडे वळली, त्यामुळे बसचा दरवाजा खाली आला. अशा परिस्थितीत लोकांना बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता.
◾होरपळलेलें मृतदेह ओळखणे कठीण
अपघातानंतर बसमधील डिझेल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरले. डिझेल सांडल्यामुळे बसला आग लागली. पोलिसांनी बसमधून 25 मृतदेह बाहेर काढले आहेत. गंभीर भाजल्याने मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
जखमींना सिंदखेड राजाच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या वरती उपचार चालू आहे मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास संघात झाल्याची प्राथमिक माहित
अपडेट माहिती घेत आहोत…