आ.धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाची शपथ घेताच परळीत फटाके फोडून आनंदोत्सव

परळी/ एमएनसी न्यूज नेटवर्क-   परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर परळी शहरात फटाके फोडून जोरदार आनंदोत्सव साजरा केला.
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकार मध्ये आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात धनंजय मुंडे यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री पदाची जबाबदारी पार पाडली होती.
आज दुपारी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर, मार्केट कमिटी येथे तसेच शिवाजी चौक आदी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला.