अजितदादाच्या बंडानंतर राष्ट्रवादीत मोठे खिंडार

सकाळचा झाला.. आता दुपारच्या शपथविधीने महाराष्ट्राला झणझनाट ,सोशल माध्यमातून लाखोंच्या संख्येने मिम्स

या उलथापालथीवर अनेकांच्या प्रतिक्रिया.

मुंबई – एमएनसी न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राचा ‘दिगू टिपणीस झाला – 

मुंबई : महाराष्ट्रातील ताज्या सत्तानाट्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्राचा ‘सिंहासन’ सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला, अशा मार्मिक शब्दांत आपला उद्वेग व्यक्त केला.

जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सिंहासन’ चित्रपटामध्ये निळू फुले यांनी दिगू टिपणीस हे पत्रकाराचे पात्र साकारले आहे. सत्ताकारणातील निष्ठूर खेळ्या आणि त्यात जनतेशी केली जाणारी प्रतारणा पाहून अखेरीस त्या पत्रकारास वेड लागते.

तोच संदर्भ राज ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत दिला आहे. याबाबतच्या ट्विटमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, उद्धव ठाकरेंचे ओझे शरद पवारांना उतरवायचे होते. त्याचा पहिला अंक रविवारी पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली. यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !

राज ठाकरे

पक्षफुटीची नव्हे; त्या आमदारांची चिंता – पवार

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीवर घोटाळ्याचा आरोप केला होता. यानंतर तातडीने राष्ट्रवादीचे नऊ आमदार मंत्रिमंडळात सहभागी झाले. याचा अर्थ त्यांच्या मनात कारवाईची भीती होती. त्यामुळे आमदार सोडून गेल्याचे श्रेय हे मोदींना द्यावे लागेल. तसेच मला पक्षफुटीची नव्हे तर सोडून गेलेल्या आमदारांच्या भवितव्याची चिंता

अन्यथा कारवाईला सामोरे जा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मी अध्यक्ष आहे आणि मी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये पक्षाच्या सरचिटणीसपदी सुनील तटकरे यांची तर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल याची नियुक्ती केली होती. त्यामुळे आता या दोघांनी मला रीतसर लिहून द्यावं किंवा मला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. सरचिटणीसांसाठी पक्षा नियमावली बंधनकारक असते.

◾राजकारण लक्षात घेता पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. एकाच्या घरी नांदायचं, दुसऱ्याचं मंगळसूत्र घालायचं, उखाणा तिसऱ्याचा घ्यायचा अन् गर्भ मात्र चौथ्याचा वाढवायचा, अशी विचित्र परिस्थिती दुर्दैवाने महाराष्ट्राच्या राजकारणात आहे!”

ॲड.उज्वल निकम

◾अजितदादांनी विकासाला साथ दिली आहे. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आपण स्वागत करतो. आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यामुळे राज्यातील सरकार ट्रिपल इंजिनवर चालणार असून, राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.

◾देशाचे यशस्वी पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

◾ हा काही राजकीय भूकंप असल्याचे मी मानत नाही. आताच्या सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा आहे, असे शिंदे-फडणवीस दावा करतात. मग अजित पवारांच्या टेकूची यांना का गरज भासावी? याचाच | अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदि याच्यासोबतचे १६ आमदार अपात्र ठरणार आहेत. राज्याला लवकरच म्हणजे पुढच्या काही दिवसांत नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे.
– संजय राऊत, खासदार (उबाठा सेना)