राष्ट्रवादी पक्षास सोडून गेलेले प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी- शरद पवार यांचे ट्विट

मुंबई – नुकत्याच राष्ट्रवादी पक्ष काहीजणांनी सोडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सामील झाले होते, यावर राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दुपारी काही वेळापूर्वी एक महत्त्वाचे ट्विट करून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची नावे पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची नावे त्यांनी केलेल्या पक्षविरोधी कारवायांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश देत आहे.