अपघात
मुंबई – आग्रा महामार्ग – पळासनेर
या भीषण अपघातात 13 जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात मुंबई-आग्रा
महामार्गावरील पळासनेर बायपासवर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, मदत कार्य सुरू झालेले आहे.
या भयावह अपघाताची घटना धुळे जिल्ह्यातील मुंबई – आग्रा महामार्गावर घडली आहे. भरधाव वेगातील मोठा कंटेनर ब्रेक फेल झाल्याने हॉटेलमध्ये घुसल्याने जवळपास 13 जण ठार तर या अपघातात जवळपास 20 पेक्षा अधिक जखमी झालेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने दोन वाहनांना उडविल्यानंतर कंटेनर हॉटेल तोडून बाहेर पडला.
यासंबंधीच्या प्राथमिक माहितीनुसार, धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ मंगळवारी सकाळी 10.30 वा. हा भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव वेगातील 14 चाकी कंटेनर थेट हॉटेलमध्ये शिरला. त्यात 13 चिरडून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.