परळीच्या ज्योती वाघमारे राज्यात तृतीय
बीड :एम एन सी न्यूज नेटवर्क– श्री काशी पीठाच्या वीरशैव सिध्दांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील परळी येथील ज्योती वाघमारे या वीरशैव सिध्दांत प्रवीण परीक्षेत राज्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची माहिती परीक्षा विभाग प्रमुख श्री राजेंद्र बलसुरे यांनी दिली
श्री काशी विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठ, जंगमवाडी मठ, वाराणसी आयोजित वीरशैव सिध्दांत प्रबोध, प्रवीण व पंडित परीक्षा मे २०२३ चा निकाल घोषित करण्यात आला असून पुढील परीक्षार्थी हे बीड जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
वीरशैव सिद्धांत प्रबोध परीक्षा : प्रथम सौ सुनंदा श्रीकांत निर्मळे , द्वितीय श्री संतोष चौधरी,तृतीय सौ जयश्री सुधाकरअप्पा पोखरकर , वीरशैव सिध्दांत प्रवीण परीक्षा : प्रथम सौ ज्योती सोमनाथअप्पा वाघमारे (बर्दापुरे ), द्वितीय श्री रविशंकर शंभुलिंग स्वामी तृतीय श्री योगीराज गंगाधरअप्पा बर्दापुरे,
परीक्षेतील सर्व परीक्षार्थींना प्रमाणपत्र वितरण व सत्कार समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वीरशैव सिध्दांत परीक्षा बीड जिल्हा प्रमुख तथा परळीच्या केंद्रसंचालिका सौ.चेतना गौरशेटे यांनी यावेळी दिली. त्याची माहिती सर्व परीक्षार्थींना कळवण्यात येणार आहे.
वरील सर्व यशस्वी परीक्षार्थींना व सर्व केंद्र संचालकांना श्री काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी आशिर्वाद दिले. तसेच श्री दानम्मा देवी देवस्थान ट्रस्ट गुड्डापूरचे अध्यक्ष श्री सिध्दय्या स्वामी-हिरेमठ, उषाताई पसारकर, वीरशैव साहित्याचे अभ्यासक डॉ. अनिल सर्जे, परीक्षा विभागप्रमुख श्री राजेंद्र बलसुरे, परीक्षा सहाय्यक श्री गुरूशांत रामपुरे यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो : काशीपीठाच्या वीरशैव सिद्धांत परीक्षेतील यशस्वी परीक्षार्थी