भारतीय क्रिकेट संघ निवडसमिती प्रमुख पदी अजित आगरकर यांची निवड

निवड – नियुक्ती:◾ निवडसमितीमध्ये शिवसुंदर दास, सलील अंकोला, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन सैराट यांचा समावेश.

मुंबई– माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष बनले आहेत. बीसीसीआयने मंगळवारी प्रसिद्धस दिलेल्या माहिती नुसार अजित आगरकर यांची मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती जाहीर केली. मुळात आगरकरांना मुख्य निवडकर्ता बनवण्याची तयारी यापूर्वीच केलेली होती

आगरकर मुख्य निवडकर्ता होणार असल्याच्या अटकळ आधीच पसरल्या होत्या. कारण काही दिवसांपूर्वी माजी वेगवान गोलंदाजाला आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने सहाय्यक प्रशिक्षक पदावरून सोडले होते. त्यानंतर आगरकर यांनी निवड समितीचे सदस्य होण्यासाठी अर्ज केला.

◾अजित आगरकर यांची कारकिर्द

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 45 वर्षीय माजी भारतीय वेगवान गोलंदाज आगरकर यांनी 26 कसोटी, 191 एकदिवसीय आणि 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 58, 58, 288 आणि तीन विकेट्स घेतल्या.