अजित पवार यांच्यासह सत्तेमध्ये सहभागी झालेल्या 9 आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबित केलं आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत ही कारवाई केली आहे.
नवी दिल्ली, 6 जुलै : अजित पवारांच्या या बंडानंतर शरद पवार यांनी अजित पवार त्यांच्यासोबतचे 8 मंत्री झालेले आमदार, प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांचं पक्षातून निलंबन केलं आहे.
नवी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे 9 आमदार, प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्या निलंबनाचा निर्णय घेतला गेला. शरद पवार यांच्या या निर्णयामुळे अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील या आमदारांवर तसंच प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.