कोकणला अतिवृष्टीचा इशारा

पुणे : देशातील बहुतांश राज्यांत अतिवृष्टी सुरू असून, गुरुवारी (दि. ६) कोकण, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यातील अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली. कोकण व मध्य महाराष्ट्रात १० जुलैपर्यंत पाऊस वाढणार असून, मराठवाडा, विदर्भात मात्र ८ जुलैनंतर तो ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

देशातील सर्वच राज्यांना १० जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, यात अंदमानसह अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, हिमालय, सिक्कीम, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड,जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरू असताना पुणे | शहरासह जिल्ह्यात पाऊस कमी असून पश्चिम महाराष्ट्रातील धरणांनी तळ गाठलेला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या -अतिवृष्टी,मुसळधार, आणि मध्यम पावसाच्या तारखाचा अंदाज

• कोकण: ७ ते १० जुलै : अतिवृष्टी. ● मध्य महाराष्ट्र : ७ व ८ जुलै : अतिवृष्टी, ९ व १० जुलै मुसळधार.

● मराठवाडा : ७ व ८ जुलै : अतिवृष्टी, ९ व १० जुलै : मध्यम पाऊस.