अनुष्ठान समितीच्या अध्यक्षपदी सौ.सुरेखाताई मेनकुदळे तर कार्याध्यक्षपदी सौ.सरोजनीताई हालगे यांची निवड
परळी/एमएनसी न्यूज नेटवर्क-:-अधिकमास व श्रावण महिन्यानिमित्त श्रीक्षेत्र वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परिसरातील श्री श्री श्री 1008 श्रीशैल्य सुर्या सिंहासन महापिठाचे जगद्गुरु डॉ चन्न सिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांचे तीन दिवसीय तपोअनुष्ठान वैद्यनाथ मंदिर जवळील हालगे गार्डन येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
या सोहळ्यास २० जुलैपासून प्रारंभ होणार आहे. दि .20, 21, 22 असे तीन दिवस हे अनुष्ठान चालणार आहे. या अनुष्ठनाच्या तयारीसाठी ष. ब्र. श्री १०८ नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ, ष. ब्र. श्री १०८ श्री. चंद्रशेखर गुरु प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांच्या उपस्थितीत वीरशैव लिंगायत समाजाची एक व्यापक बैठक येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान बेलवाडी येथे घेण्यात आली बैठकीत तपोअनुष्ठान सोहळा नेत्रदीपक व यशस्वी करण्यासाठी श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थानचे अध्यक्ष दत्तापा इटके गुरुजी श्री वक्रेश्वर मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे , श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री विजयकुमार मेनकुदळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
अनुष्ठान समितीचे अध्यक्षपदी सौ.सुरेखाताई मेनकुदळे तर कार्याध्यक्षपदी सौ.सरोजनीताई हालगे, उपाध्यक्ष सौ.चेतना गौरशेटे, सौ. श्रद्धा नागेश हालगे, सचिव सौ.उमाताई शमशेटे, सहसचिव सौ.रामाताई आलदे, सौ.पालवी निर्मळे, कोषाध्यक्षपदी सौ.रेखा बघमारे, मार्गदर्शन समिती नारायणअप्पा खके, माणिकअप्पा हालगे, प्रा.सुधीर फुलारी, आत्मलिंगआप्पा शेटे, शिवकुमार व्यवहारे, प्रभू आप्पा ईटके, ऍड.गिरीश चौधरी, चंद्रकांत उदगीरकर, महेश निर्मळे, प्रा.अरुण अर्धापुरे, सौ.अन्नपूर्णा निर्मळे स्वागत समिती शाम बुद्रे, महादेव ईटके, रमेश चौडे, विकास हालगे, अनिल अष्टेकर, सुशील हरंगुळे, ऍड.मनोज संकाये, श्रीकांत निर्मळे, सचिन स्वामी, शिवकुमार चौडे, योगेश मेनकुदळे सौ.अन्नपूर्णा निर्मळे, श्रीमती.गोदावरी चौधरी, सौ.रामा आलदे, श्रीमती प्रेमला वेरूळे, श्रीमती गोदावरी हालगे, श्रीमती. शकुंतला अष्टेकर, सौ.अलका हुंडेकरी, श्रीमती अशा हरंगुळे, सौ.सुनीता खानापुरे, भोजन समिती प्रमुख प्रकाश खोत, सतीश रेवडकर, रामेश्वर परांडकर, बंडू चौडे, नरेश पिंपळे, नरहरी टेकाळे, महात्मा हत्ते सर, मन्मथ कापसे, योगेश घेवारे, रोहित हालगे, दाम्पत्य व पाद्यपूजा समिती प्रमुख दयानंद स्वामी, गणेश स्वामी, राजेश तिळकरी, अमोल मोडीवाले, दयानंद चौधरी, डॉ.योगीराज बरदापूरे, राजेश्वर निर्मळे, सौ.शिवकला तिळकरी, सौ.कोमल बेलुरे सुजाता स्वामी, निवास स्ववस्था नागेश हालगे, योगेश स्वामी, स्टेज समिती प्रमुख धनंजय स्वामी,संतोष कोरे, पावन तोडकरी, शेखर गडगे, अर्थ समिती प्रमुख वैजनाथ ईटके, नितीन समशेटे, धनंजय हालगे, गजानन हालगे, प्रसिद्धी प्रमुख जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, संजय खाकरे, संपादक राजेश साबणे, संतोष जुजगर, सूत्रसंचन प्रमुख सौ.वैशाली रुईकर आदीची निवड करण्यात आली आहे. या बैठकीस मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.