परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या टिमवर्कमुळेच चांगले कार्य करता आले-सपोनी मारुती मुंडे

परळी ग्रामीण पोलीस ठाणे व पत्रकार बांधवांच्या वतीने सपोनि मारुती मुंडे यांना निरोप

परळी/ एमएनसी न्यूज नेटवर्क-:-परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या टिमवर्कमुळे व लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या मीडियाच्या सहकार्यामुळेच परळी ग्रामीण पोलीसांना गेल्या एक-दीड वर्षभरात मोठ्या जोमाने काम करता आले. अनेक कारवाया, कोंम्बीग ऑपरेशन करून गुन्हेगारांना पकडण्यात यश आले आहे.परळी ग्रामीण हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात यश आले. परळी ग्रामीण ठाण्याच्या सर्व पोलीस कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे परळी ग्रामीण पोलीस ठाणे जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळाला होता असे प्रतिपादन परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी केले.

परळी ग्रामीण पोलीस ठाणे व परळीतील पत्रकार बांधवांच्या वतीने सपोनि मारुती मुंडे यांची परळी ग्रामीण येथून धराशीव जिल्ह्यात आंतरजिल्हा बदली झाल्यामुळे निरोप समारंभ आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गित्ते हे होते. या प्रसंगी सपोनि मारोती मुंडे यांचा शाल, पुष्पहार तसेच पेढे भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सपोनि गणेश झांबरे, पो. कॉ. विष्णू घुगे, पो. कॉ.सुनील अन्नमवार, पो. कॉ.परतवाड, बडे, पो.कॉ. राहुल धायजे, पो. कॉ.रमेश तोटेवाड, पो. कॉ. नवनाथ हरेगावकर, मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वयक धनंजय आरबुने, पत्रकार भगवान साकसमुद्रे,जगदीश शिंदे,डिजिटल मीडिया परिषदेचे परळी तालुका अध्यक्ष नितिन ढाकणे,तालुका सचिव दिपक गित्ते, अफसर सय्यद, ऍड. सोनेराव सातभाई तसेच पोलिस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सपोनि गणेश झांबरे यांनी केले.पत्रकार धनंजय आरबुने, नितीन ढाकणे, जगदीश शिंदे, रमेश तोटेवाड,आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोप सपोनि नारायण गित्ते यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे यानी केले तर उपस्थितांचे आभार धनंजय अरबुने यानी मानले.

सपोनि मुंडेंच्या कार्यकाळात परळी ग्रामीण पोलीस ठाणे जिल्ह्यात प्रथम

सपोनि मारुती मुंडे यांची परळीहून धाराशिव जिल्ह्यात आंतरजिल्हा बदली झाली असून परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला तब्बल दोन वर्षे प्रभारी अधिकारी म्हणून त्यांनी कामकाज केले. एक कर्तव्यदक्ष अधिकारी काय करू शकतो. याची धमक त्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याला असताना नागरिकांना व गुन्हेगारांना दाखवून दिली होती. अनेक कारवायांचा सपाटा त्यांनी अवैधधंद्या वाल्याविरुद्ध सुरू केला होता. परळी ग्रामीण हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले होते. यामुळे परळी ग्रामीण पोलीस ठाण्यास बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सपोनि मारुती मुंडे यांच्या कार्यकाळात मिळाले होते.