कोकणातील तीन जिल्ह्यातील धरणे भरली, मराठवाडा मात्र अद्याप कोरडाच

रायगड/महाड- महाराष्ट्रात विदर्भ ,पश्चिम महाराष्ट्रात सरासरी जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयात झालेल्या समाधानकारक पावसामुळे परिसरातील महत्त्व पूर्ण अनेक धरणे भरली असून यांत सिंधुदुर्गातील ३, रायगड जिल्हा ६ आणि रत्नागिरीजिल्हा ३ धरणांचा समावेश आहे. धरणात मुबलक पाणीसाठा साऱ्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रामध्ये पाटबंधारे विभाग अंतर्गत येणारी रायगड जिल्हयातील पाच धरणांचा समावेश असून यामध्ये खैरे, कोथुर्डे, वरंध, खिडवाडी, बिरवाडी, फणसाड रत्नागिरी जिल्हयातील चोरगे, शीळ, तर सिंधुदुर्ग जिल्हयातील हरपून, नाझवडे, सागाव, जि अशी धरणे भरली आहेत. गेल्या पंधरा वर्षांपूर्वी निर्माण अवस्थेत असलेल्या रायगड विभागातील काळकुंभे जलविद्युत प्रकल्पासह विन्हेरे व वरंध विभागातील नागेश्वरी व कोलकोघेरी या अपूर्णावस्थेतील धरणांचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यातील कवडास धरण १०० टक्के, तर वांद्री ८० टक्के भरले आहे.

चालू वर्षी लांबलेल्या पावसामुळे महाड शहरासह संपूर्ण तालुक्यात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. महाड तालुक्यातील विविध धरण क्षेत्रातून येणाऱ्या पाण्यावर महाड तालुक्यातील जनतेची तहान भागवली जाते महाड शहर गेल्या दीड दशकांमध्ये लोकसंख्या दुप्पट झाली असून शहराच्या वाढत्या पाण्याची गरज भागवण्यासाठी महाड औद्योगिक वसाहतीच्या पोलादपूर तालुक्यातील बाजीरे धरणातून तसेच रायगड विभागातील कोथुर्डे व पालिकेच्या मालकीच्या कुर्ला धरणातून पाणीपुरवठा आहे. महाड, पोलादपूर, या तालुक्यातील पाणी प्रश्नांवर लक्ष न दिल्यास या भागाचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही,अश्या प्रतिक्रिया ग्रामीण भागातील जनतेसह या क्षेत्रात काम करणाऱ्या पर्यावरणप्रेमी नागरिकांत चर्चिल्या जात आहेत.