धारूर तालुक्यात पंढरपूर खामगाव महामार्गावर अपघातात दोघांचा बळी

आंबेवडगाव येथील अपघातात दोघा दुचाकी स्वरांना अज्ञात वाहनाने दिली धडक

बीड/धारूर- एमएनसी न्यूज नेटवर्क तालुक्यातील आंबेवडगाव येथे याच खामगाव पंढरपूर महामार्गावर अज्ञात वाहनाने दोन दुचाकी स्वरांना जोराची धडक दिली असता यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला उपचारार्थ घेऊन जात असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.धारूर शहरातून गेलेला खामगाव पंढरपूर हा महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे . धारूर माजलगाव दरम्यान या रस्त्यात अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत सिमेंट रस्ता असूनही जीव घेणे खड्डे निर्माण झाले आहेत .

खामगाव -पंढरपूर महामार्गावरील धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथे सेलू तालुक्यातील झरी या गावचे दोन युवक 9 जुलै बुधवार रोजी 12 वाजेच्या दरम्यान धारूर कडे येत असताना त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहणाने धडक दिल्याने भीषण अपघात होऊन या अपघातामध्ये पंडित सुतारे (38) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याच दोन चाकी वाहनावरील अनिल अडागळे यांचा पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ येथे घेऊन जात असताना अडागळे यांचा मृत्यू झाला.या महामार्गावर अपघाताच्या घटना वरचेवर वाढत आहेत वाहनधारकांना वेग मर्यादा न पालन करण्याने अशा घटना घडत असल्या तरी प्रत्यक्षात या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे  जागोजागी पाहायला मिळत आहे.