भारताने केले चांद्रयान 3 मोहिमेचे रॉकेट लॉन्च

संशोधन -आंध्रप्रदेश/श्रीहरिकोटा– चांद्रयान-2 लाँच झाल्यानंतर  सुमारे चार वर्षाने भारत चांद्रयान-3 मिशन लॉन्च करणार आहे.आज दि.१४ जुलै रोजी सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून दुपारी 2.35 वाजता प्रक्षेपण करण्यात आले.  दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3-M4 रॉकेटद्वारे ते अवकाशात पाठवले . या मोहिमेद्वारे भारताला आपली अंतराळ शक्ती जगाला दाखवायची आहे. मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल.

चांद्रयान- ३ अंतराळयानामध्ये तीन लँडर / रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहेत. सुमारे 40 दिवसांनंतर म्हणजेच 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील. हे दोघेही 14 दिवस चंद्रावर प्रयोग करतील, तर प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल. मिशनच्या माध्यमातून इस्रो चंद्राचा पृष्ठभाग किती सिस्मिक आहे हे शोधून काढेल, माती आणि धूळ यांचा अभ्यास केला जाईल.चांद्रयान- 3 चे बजेट सुमारे 615 कोटी रुपये आहे. 4 वर्षांपूर्वी पाठवलेल्या चांद्रयान 2 चा खर्चही 603 कोटी रुपये होता.