परळी/ एमएनसी न्यूज नेटवर्क -गोविंद महाराज केंद्रे असेल त्या परिस्थितीत गावकुसातील सामान्यतील सामान्य कार्यकर्तत्याला आपल्या कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देऊन ते मिळालेले मंत्रीपद सर्वसामान्य जनतेच्या चरणी समर्पित करून हत्तीच्या ताकती च्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रभर फौज निर्माण करणारा राज्याच्या राजकीय पटलावर खरा लोकनेता राज्याचे कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे च आहेत अशी ओळख राज्यात मुंडे यांची निर्माण झाले आहे
नामदार धनंजय मुंडे यांना पाहिल्यावर कठोर प्रशासक वाटणारे मुंडे खूपच हळव्या मनाचे आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात मुंडे कुटुंबीय सहभागी होऊन दुःखात आधार देण्याचे काम करतात प्रसंगी आनंदात शाबासकी देऊन ऊर्जा वाढवण्याचे काम करतात यात सौ राजश्री वहिनी साहेबांचा पण मोठा सहभाग आहे कार्यकर्त्याला आईची माया देऊन सन्मान करण्याचे मातृत्व नक्कीच परमेश्वराने राजमान्य राजश्री राजलक्ष्मी सौ राजश्री धनंजय मुंडे यांना दिल्याने कार्यकर्त्यांशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे कार्यकर्त्याचा लाड धनंजय मुंडे नीच करावा त्यामुळे एकदा मुंडेंच्या संपर्कात आलेला कार्यकर्ता दुसऱ्या कोणत्याच नेत्यापाशी राहू शकत नाही ही मुंडेंची मोठी जमेची बाजू आहे आणि ते त्या पद्धतीने कार्यकर्त्यांना न्याय देतात.
एक कार्यकर्त्या मुंडेंच्या वैभवावर पदावर प्रेम करणारा तर दुसरा निस्वार्थ फक्त आपल्या धनंजय भाऊ वर प्रेम करणारा आहे मुंडे साहेबांना नक्कीच माहित आहे की पदावर वैभवावर प्रेम करणारा कार्यकर्ता कधीच आपला होऊ शकत नाही व गावकुसातील भोळा बाबळा कार्यकर्ता आयुष्यभर आपल्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही भले त्याला काही मिळो नाही मिळो म्हणून साहेब ही आशा कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करताना अनेकदा त्यांच्या 25 वर्षाच्या राजकीय जीवनात अनुभवले आहे. अनेक जीवघेणी संकटे आली पण यातून सहीसलामत सुखरूप नामदार धनंजय मुंडे बाहेर आले ते स्वर्गीय पंडितांना आणि बाई म्हणजे आई वडिलांच्या पुण्याइने संकट काळी मायबापांची पुण्याई व राजश्री वहिनींचे पातीव्रत्याचे तेजस्वी बळ नामदार धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिल्यानेच धनंजय मुंडे साहेब सुखरूपआहेत हे कोणीच नाकारू शकत नाही कारण मागील दोन वर्षात एवढी संकटे मुंडेंवर आली की आता या संकटांना स्वतःची लाज वाटत आहे की मुंडे आपल्यापेक्षा प्रभू वैद्यनाथ संत जगमित्र नागा व जनतेच्या आशीर्वादाने अनेकदा संकटांना अपमानित होऊन परतावे लागले आहे. त्यामुळे संकटांनी येणाऱ्या काळात मुंडेंचा नाद करायचा नाही असे नक्कीच ठरवले असणार, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे लोक कल्याणकारी लोक नेत्याकडून अपेक्षा एवढीच आहे की साहेब काळजी घ्या स्वतःची.
विकास प्रगती होत राहील नाही झाली तरी आम्ही कसेही जगू पण त्यासाठी तुम्ही आमच्यात असणे फार गरजेचे आहे या मराठवाड्याने खूप मोठी राजकारणाची किंमत मोजली आहे स्वर्गीय रघुनाथराव मुंडे साहेब प्रमोद जी महाजन स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब विनायक मेटे साहेब अशी काही त्यातले नावे आहेत म्हणून आम्हाला विकासाची चिंता नाही आम्हाला भीती आहे ती शूद्र बुद्धीच्या लोकांची म्हणून साहेब काळजी घ्या स्वतःची एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी लग्न आहे म्हणून मुंबईवरून बायकार रात्री निघून सकाळी परळीत येऊन दिवसभर मतदारसंघात लोकांच्या आनंदात सहभागी होऊन परत रात्री प्रवास करणे हे आम्हाला मान्य नाही आम्ही आता आपल्या सानिध्यात नक्कीच आपली अडचण समजून घेण्या इतके समजदार झालो आहोत समजून घेऊ आम्ही कारण या देशाला या राज्याला तुमची गरज आहे तुम्हाला बीड जिल्ह्याला ऊसतोड मजुरांचा मागासलेला जिल्हा आहे. हा लागलेला कलंक पुसून काढायचा आहे. तुम्हाला स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. तुम्हाला स्वर्गीय पंडित अण्णांच्या मनातला वैभवशाली शेतकरी निर्माण करायचा आहे, आणि एक सुजलाम सुफलाम महाराष्ट्र निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर स्वर्गीय अण्णांच्या आशीर्वादाने कृषी मंत्री पद देऊन या जनतेने सोपवली म्हणून आपणास महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा देताना म्हणावेसे वाटते… या ओठांनी चुंबन घेईन हजारदा इथली माती, अनंत मरणे सोसून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे.. शतदा प्रेम करावे.. शतदा प्रेम करावे!
गोविंद महाराज केंद्रे
94 21 33 70 32