गुरुवारी घेतला चार्ज, आणि शुक्रवारी लाच घेताना पीएसआय ला अटक

◾ एक लाख रुपयाची लाच घेताना छत्रपती संभाजी नगर मध्ये पीएसआय ला अटक,

छत्रपती संभाजी नगर- फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाखाची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला एसीबीने रंगेहाथ पकडले. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जिन्सी भागात ही कारवाई करण्यात आली.जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराला एक लाख रुपये मागितले होते.

अशफाक शेख असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. विशेष म्हणजे गुन्हे शोध (डीबी) पथकाची त्याने गुरुवारी जबाबदारी स्वीकारली होती. आणि शुक्रवारी लाच घेताना तो अडकला.पोलिस उपनिरीक्षक शेखने  पैसे न दिल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करू, असे साक्षीदाराला धमकावले होते.

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पथकाने सापळा रचत शेखला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.