धबधब्यांच्या असंख्य रागांचा स्वर्गीय अनुभव ‘माळशेज घाट’

ठाणे जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग आणि विभागाकडून पर्यटकांची वाढती संख्या पाहता पर्यटकांना आनंद लुटता यावा यासाठी खास पॉईंटही विकसित केले आहेत. त्यामुळेच हजारो पर्यटक शनिवार-रविवारी आनंद लुटण्यासाठी माळशेज घाटाला पसंती देतात.

परळी वैजनाथ/ठाणे-कल्याण/ एमएनसी न्यूज नेटवर्क- पावसाळ्यात धुंद हवा आणि पाण्याचे तुषार अंगावर घेत धुक्याने दाटलेल्या रस्त्यावरून अल्हाददायक वातावरणात भेट देण्याचे ठिकाण म्हणजेच माळशेज घाट.
परळी वैजनाथ कल्याण या बसनेही आपण माळशेज घाटाला भेट देऊ शकतो नगर पासून पुढे कल्याण कडे जाताना रस्त्यावरील माळशेज घाट होय. सह्याद्रीच्या भव्य रांगांनी नटलेल्या पाटातील हिरवागार निसर्ग हा डोळ्यांचे पारणे फेडतो. रस्त्याकिनारी धबधब्यांच्या असंख्य रागां म्हणजे जणू स्वर्ग, बहरलेली दुर्मीळ फुले, विदेशी पक्षांचा किलबिलाट, दरीतून वर फिरणारे दाट धुके, हिरवी शालू पांघरलेला डोंगर-दन्यांचा परिसर हा पर्यटकांना वेड लावतो. त्याच ओढीने पर्यटकांच्या तोबा गर्दीन घाट परिसर गजबजून जातो.

माळशेज घाट हा पावसाळ्यातील प्रवाशांचे अनुभूती ही निराळीच ठरते. मुसळधार पाऊस, सर्व काही आच्छादून टाकणारे सकाळचे धुके, हवेतील हलकीशी थंडी काही क्षणार्धात आपल्या अंगाला स्पर्शन जाणारी धुक्याची चादर आणि डोंगरावर भरून येणान्या गांच्या वैभवातून वाहणारे धबधबे हे पर्यटकांना मोहून टाकतात.

◾ कसे जाल- मराठवाड्यातील पर्यटकांना माळशेज घाट ला जाण्यासाठी नगर – कल्याण आळेफाटा असं जाता येईल.वर्षभर कोरडा असलेल्या या घाट परिसर पावसात बदललेले दिसतात. कल्याणपासून ८५ कि.मी १२६ ६.कि.म अंतरावर असून पुण्यापासून तो ११८ कि.मी लांब आहे. मुंबई-ठाणे-कल्याण-मुरबाड- टोकावडे मार्ग खासगी वाहनांनी पाटगाठता येते. काही जग कल्याणपर्यंत रेल्वेने जातात आणि कल्याणहून बस अथवा खासगी वाहनांनी माळशेज गाठतात.

पायी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत असाल तर आपल्या आवडीनिवडीनुसार छोट्या मोठ्या अनेक धबधब्याचा आनंद घेता येतो. माळशेज घाटाला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये दुचाकीवरून येणाऱ्या प्रत्येकाची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. माळशेज घाट आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जवळच सिद्धगड हेही एक इतिहासकालीन सुंदर ठिकाण आपणास पाहता येतं सिद्धगड परिसरातील धबधबे मनाला अतिशय आकर्षित करतात येथील धबधबा प्रसिद्ध आहे ते पाहण्यासही पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात पावसाळी पर्यटनाचे आनंद असणारे असंख्य पर्यटक पावसाळ्यात माळशेज घाट परिसराला भेट देत असतात.